Shubman Gill

Shubman Gill : शुभमन गिलला ICC चा ‘हा’ खास पुरस्कार जाहीर; सिराजलादेखील टाकलं मागे

601 0

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – भारत आणि पाकिस्तान सामन्यापूर्वी शुभमन गिल (Shubman Gill) याची सध्या जोरदार चर्चा सुरु आहे. शुभमन गिल पाकिस्तानविरोधात मैदानात उतरणार का? यावरुन सोशल मीडियावर चर्चा सुरु आहे. यादरम्यान आयसीसीने शुभमन गिलला खास पुरस्काराने सन्मानित केले आहे. सप्टेंबर महिन्यात सर्वोत्तम कामगिरी केल्यामुळे शुभमन गिल याला आयसीसीने प्लेअर ऑफ दी मंथ हा पुरस्कार जाहीर केला आहे.

आयसीसीने सप्टेंबर 2023 च्या प्लेअर ऑफ दी मंथ पुरस्काराची घोषणा केली आहे. यंदाच्या महिन्यात शुभमन गिल (Shubman Gill) याला या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. शुभमन गिल याने सहकारी खेळाडू मोहम्मद सिराज याला मागे टाकले आहे. त्याशिवाय डेविड मलान यालाही मागे टाकत गिल याने पुरस्कारावर नाव कोरले.

सप्टेंबर महिन्यात शुभमन गिल याने 80 च्या जबराट सरासरीने 480 धावा केल्या होत्या. सप्टेंबर महिन्यात आशिया चषकात सर्वाधिक धावा शुभमन गिल याच्या नावावर आहे. आशिया चषक स्पर्धेत शुभमन गिल याने 75.5 च्या सरासरीने 302 धावा केल्या आहेत. त्यानंतर ऑस्ट्रेलियाविरोधात शुभमन गिल याने दोन सामन्यात 178 धावा चोपल्या होत्या. त्यामुळेच शुभमन गिल याला आयसीसीने प्लेअर ऑफ दी मंथ पुरस्काराने गौरवले आहे.

Share This News
error: Content is protected !!
WhatsApp

WhatsApp

1
Join Us On WhatsApp 😊.
Hide