सांगली: यावर्षी सांगलीमध्ये पहिल्या महिला महाराष्ट्र केसरी स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं. सांगलीची प्रतीक्षा बागडी ही पहिली महिला महाराष्ट्र केसरी ठरली आहे.
१ ली महिला महाराष्ट्र केसरी – सांगली २०२२ प्रतीक्षा बागडी ( सांगली )
हार्दिक अभिनंदन
प्रा बाळासाहेब लांडगे
सरचिटणीस
महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषद pic.twitter.com/LTEPwdWfFJ— Maharashtra State Wrestling Association म.रा.कु.प. (@StateMswa) March 24, 2023
तिने कल्याणमधील वैष्णवी पाटीलला चितपट करत हा मान मिळवला.
गेल्या अनेक दिवसांपासून कुस्तीप्रेमींचे या स्पर्धेकडे लागलेले होते. कारण पहिल्यांदाच महाराष्ट्रात महिलांसाठी महाराष्ट्र केसरी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. ज्यामुळे आता महाराष्ट्र केसरी विजेती प्रतीक्षा बागडी हिची कुस्तीच्या इतिहासात नोंद केली जाणार आहे. कधीकाळी हरियाणा येथे कुस्तीच्या सरावासाठी एकत्र असताना रुम पार्टनर राहिलेल्या सांगलीच्या प्रतीक्षाने कल्याणच्या वैष्णवी पाटीलला पछाडत पहिली महाराष्ट्र केसरीची चांदीची गदा आपल्या नावे केली आहे. प्रतीक्षा बागडीच्या या विजयानंतर सर्व स्तरातून तिच्यावर कौतुकाचा वर्षाव केला जात आहे.
दरम्यान, सांगली-मिरज रस्त्यावर असलेल्या जिल्हा क्रीडा संकुल येथे हा ऐतिहासिक असा अंतिम सामना खेळवला गेला. सामन्याच्या सुरुवातीस प्रतीक्षा बागडी आणि वैष्णवी पाटील या दोघी चार गुणांसहित बरोबरीत होत्या. पण अंतिम लढतीत प्रर्तीक्षाने युक्तीच्या आणि बळाच्या जोरावर वैष्णवीला चितपट करत दहा गुण मिळविले आणि मानाच्या चांदीच्या गदेवर आपले नाव कोरले.