#PUNE : पुणे महापालिका आयुक्तांनी सादर केलेले अंदाजपत्रक शहराच्या विकासाला चालना देणारे – जगदीश मुळीक

517 0

पुणे : पुणे महापालिका आयुक्ताने सादर केलेले अंदाजपत्रक हे शहराच्या विकासाला चालना देणारे आहे. शहर भाजपने केलेल्या मागणीनुसार कोणतीही करवाढ पुणेकरांवर लादण्यात आलेली नाही.

भाजपने सुरू केलेली मेट्रो, नदी शुद्धीकरण आणि सुशोभीकरण आरोग्य यंत्रणांचे सक्षमीकरण, भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालय निर्मिती, ठिक ठिकाणी उड्डाणपूल, रस्ते विकास याला प्राधान्य देण्यात आले आहे. भाजपच्या कारकिर्दीत सुरू झालेली विविध विकासकामे पूर्ण होण्यास या अर्थसंकल्पामुळे चालना मिळेल असा विश्वास भाजपा पुणे शहर अध्यक्ष जगदीश मुळीक यांनी व्यक्त केला आहे.

Share This News
error: Content is protected !!