Ravichandran Ashwin

Ravichandran Ashwin : आर. अश्विनने मोडला अनिल कुंबळेचा ‘हा’ मोठा विक्रम

867 0

इंदोर येथे झालेल्या दुसऱ्या वनडे सामन्यात भारताने ऑस्ट्रेलियाचा 99 धावांनी दणक्यात पराभव केला. या सामन्यात भारताकडून श्रेयस अय्यर, शुभमन गिल, केएल राहुल आणि सूर्यकुमार यादव यांनी शानदार कामगिरी केली. तर गोलंदाजी अश्विन आणि जाडेजा यांनी भेदक मारा केला. रविचंद्रन अश्विन याने 7 षटकात 41 धावांच्या मोबदल्यात 3 विकेट घेतल्या. या सामन्यात अश्विनने एक मोठा विक्रम आपल्या नावावर केला. तो ऑस्ट्रेलियाविरोधात सर्वाधिक विकेट घेणारा भारतीय गोलंदाज ठरला आहे. याआधी हा विक्रम अनिल कुंबळेच्या नावावर होता.

अनिल कुंबळेने ऑस्ट्रेलियाविरुद्ध सर्वाधिक विकेट्स घेण्याचा विक्रम केला होता. त्याचा हा विक्रम आता रविचंद्रन अश्विनने मोडला आहे. अश्विनने ऑस्ट्रेलियाविरोधात एकूण 144 विकेट घेतल्या आहेत. तर कुंबळेने 142 विकेट घेतल्या आहेत. कोणत्याही एका संघाविरुद्ध सर्वाधिक विकेट्स घेणाऱ्या भारतीय गोलंदाजांच्या यादीत कपिल देव यांचाही समावेश आहे. कपिल देव यांनी पाकिस्तानविरुद्ध 141 विकेट घेतल्या आहेत. कुंबळेने पाकिस्तानविरुद्ध 135 विकेट घेतल्या आहेत.

मालिकेबद्दल बोलायचे झाले तर भारताने दोन्ही सामने जिंकून मालिका आपल्या खिशात घातली आहे. अखेरचा सामना राजकोट येथे खेळवण्यात येणार आहे. त्या सामन्यात रोहित शर्मा, विराट कोहली, हार्दिक पांड्या आणि कुलदीप यादव संघात परतणार आहेत.

Share This News
error: Content is protected !!