Prithvi Shaw

Prithvi Shaw : पृथ्वी शॉचा मोठा निर्णय ! ‘या’ संघाकडून खेळणार क्रिकेट

914 0

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – भारताचा ओपनर पृथ्वीने (Prithvi Shaw) एक मोठा निर्णय घेतला आहे. पृथ्वी (Prithvi Shaw) आता भारत सोडून एका दुसऱ्याच देशात खेळणार असल्याचे आता स्पष्ट झाले आहे. पृथ्वी हा भारताचा विश्वविजेता कर्णधार आहे, त्याने भारताना 19 वर्षांखालील विश्वचषक जिंकवून देण्यात महत्वपूर्ण भूमिका बजावली होती. त्याला या कामगिरीच्या जोरावर भारतीय संघात स्थानही देण्यात आले होते. पण ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यात एक अशी गोष्ट घडली की, त्यानंतर त्याला भारतीय संघातून बाहेर करण्यात आले.

यानंतर त्याने बऱ्याचदा दमदार कामगिरी केली खरी, पण तरीदेखील त्याला संघात स्थान मिळवण्यात अपयश आले. त्यामुळे आता आपल्याला भारतीय संघात स्थान मिळणार नाही हे समजले असावे म्हणून त्याने आपला मोर्चा दुसऱ्या देशाकडे वळवला आहे. पृथ्वीला यंदाच्या आयपीएलमध्ये स्वत: ला पुन्हा सिद्ध करायची चांगली संधी होती. पण त्यामध्ये तो अपयशी ठरला.

प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे यांच्यावर पक्षविरोधी कारवाई करावी; सुप्रिया सुळेंचे पवारांना पत्र

या दरम्यान त्याचे सपना गिल प्रकरण चांगलेच गाजले होते. त्याचा परिणाम त्याच्या खेळावर झाला होता. त्यामुळे आता आपल्याला भारतीय संघाचे दार उघडणार नाही, हे त्याला समजले आहे. त्यामुळे आता त्याने इंग्लंडमधील एका संघाकडून खेळायचे ठरवले आहे. पृथ्वीने (Prithvi Shaw) इंग्लंडमधील Northamptonshire या संघाची करार केला आहे. कदाचित पृथ्वी 3-4 महिने या संघाकडून खेळेल आणि त्यानंतर पुन्हा भारतामध्ये परतेल. पृथ्वीला आता भारतीय संघात स्थान मिळवण्यासाठी बराच काळ वाट पाहावी लागणार आहे.

Share This News
error: Content is protected !!