Pakistan Team

ICC ODI Rankings : पाकिस्तानला मोठा धक्का! अवघ्या 48 तासांत पाकिस्तानने गमावले पहिले स्थान

754 0

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – पाकिस्तानचा संघ यंदा पहिल्यांदाच एकदिवसीय क्रिकेट क्रमवारीत (ICC ODI Rankings) अव्वल आला होता. मात्र त्यांचा हा आनंद जास्त वेळ टिकू शकला नाही. अवघ्या 48 तासांमध्ये त्यांना हे स्थान गमवावे लागले. दोन दिवस विजयी मुकुट परिधान करणारा पाकिस्तानचा (Pakistan) संघ आता तिसऱ्या क्रमांकावर ढकलला गेला आहे. या यादीमध्ये ऑस्ट्रेलियाच्या संघाने पहिले स्थान तर टीम इंडियाने दुसरे स्थान पटकावले आहे.

आयसीसी रँकिंगमध्ये भारताचा पाकिस्तानला धक्का
नुकत्याच पार पडलेल्या पाकिस्तान आणि न्यूझीलंड (New Zealand) यांच्यातील वनडे मालिकेतील चौथ्या सामन्यात पाकिस्तान संघाने न्यूझीलंडचा 102 धावांनी पराभव केला. या विजयानंतर पाकिस्तानचा संघ एकदिवसीय क्रिकेट क्रमवारीत अव्वल स्थानी पोहोचला. यानंतर पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ (Pakistan Prime Minister Shahbaz Sharif) यांनी ट्विट करून जल्लोष साजरा केला होता.मात्र त्यांचा हा आनंद जास्त काळ टिकू शकला नाही. यानंतर मालिकेतील 5 व्या सामन्यात पाकिस्तानला 47 धावांनी पराभव स्वीकारावा लागला. या पराभवामुळे पाकिस्तानचा संघ एकदिवसीय क्रमवारीत तिसऱ्या क्रमांकावर ढकलला गेला. यानंतर ऑस्ट्रेलिया आणि भारत अनुक्रमे पहिल्या आणि दुसऱ्या स्थानी आले.

पाकिस्तानला पुन्हा नंबर वन होण्याची संधी
पाकिस्तानची वनडे मधील कामगिरी बरीच सुधारली आहे. न्यूझीलंडविरुद्धची मालिका सुरु होण्यापूर्वी पाकिस्तान 106 गुणांसह क्रमवारीत पाचव्या स्थानावर होता. या मालिकेत न्यूझीलंडचा 1-4 असा पराभव केल्यानंतर पाकिस्तान 112 गुणांसह तिसऱ्या स्थानी पोहोचला आहे.

Share This News
error: Content is protected !!