Neeraj Chopra

Neeraj Chopra : नीरज चोप्राने एकाच भाल्यात साधले 2 लक्ष्य; वर्ल्ड चॅम्पियनशिपच्या फायनलसह पटकावलं पॅरिस ऑलिम्पिकचं तिकिट

1001 0

भारताचा गोल्डन बॉय म्हणून ओळखल्या जाणाऱ्या भालाफेकपटू नीरज चोप्राने (Neeraj Chopra) वर्ल्ड अ‍ॅथलेटिक्स चॅम्पियनशिपमध्ये (World Athletics Championships) जबरदस्त खेळी केली आहे. नीरज चोप्राने मेन्स जॅव्हलिन थ्रो स्पर्धेच्या अंतिम सामन्यात प्रवेश केला आहे. नीरजने आपल्या पहिल्या प्रयत्नात 88.77 मीटर लांब भाला फेकत अंतिम सामन्यात आपली जागा पक्की केली आहे. या स्पर्धेचा अंतिम सामना 27 ऑगस्टला पार पडणार आहे.

नीरज फायनलमध्ये धडक मारणारा पहिला एथलिट बनला. यासोबतच त्याने पॅरिस ऑलिम्पिकची पात्रताही मिळवली आहे. या हंगामातली त्याची ही सर्वोत्तम कामगिरी ठरली. तर एकूण कारकिर्दीतली तिसरी सर्वोत्तम कामगिरी ठरली आहे. त्याने या स्पर्धेत पहिल्याच प्रयत्नात 88.77 मीटर भालाफेक करत पहिलं स्थान पटकावलं. दुसऱ्या स्थानावर जर्मनीचा ज्युलियन वेबर आहे. तर भारताचा मनु डीपी तिसऱ्या स्थानी आहे.

Share This News
error: Content is protected !!