Mark Dharmai

Mark Dharmai : मार्क धर्माईने रचला इतिहास! सुवर्णपदकासह केली 5 मेडल्सची कमाई

572 0

भारताचा पॅरालिम्पिक खेळाडू मार्क धर्माईने (Mark Dharmai) नुकताच मोठा विश्वविक्रम रचला आहे. जर्मनी येथे वर्ल्ड ड्वार्फ गेम्स स्पर्धा पार पडली. 28 जुलै ते 5 ऑगस्ट या दरम्यान पार पडलेल्या या स्पर्धेत मार्क धर्माईने बोस्किया या क्रीडा प्रकारात दुहेरीमध्ये सुवर्णपदक जिंकले आहे. वर्ल्ड ड्वार्फ गेम्स स्पर्धेत सुवर्णपदक जिंकणारा तो पहिला भारतीय ठरला आहे.

इतकेच नाही तर मार्कने याच स्पर्धेत आणखी 4 पदके जिंकली आहेत. त्याने थाळी फेक स्पर्धेत रौप्य पदक, बॅडमिंटनमध्ये दुहेरीत रौप्य पदक, बॅडमिंटन एकेरीत कांस्यपदक तसेच भालाफेक स्पर्धेत कांस्य पदक जिंकले आहे. वर्ल्ड ड्वार्फ गेम्स स्पर्धेत एकूण 22 विविध देशातील 505 खेळाडू सहभागी झाले होते. ही 8 वी वर्ल्ड ड्वार्फ गेम्स स्पर्धा होती. या स्पर्धेतील खेळ जर्मनीतील कोलोन येथे जर्मन स्पोर्ट्स युनिवर्सिटी येथे पार पडले.

Share This News
error: Content is protected !!