Maharashtra Kesari 2023

Maharashtra Kesari 2023 : अखेर ठरलं ! महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा ‘या’ जिल्ह्यात पार पडणार

1086 0

मुंबई : महाराष्ट्र केसरी स्पर्धेबाबत (Maharashtra Kesari 2023) मोठी बातमी समोर आली आहे.महाराष्ट्र केसरीच्या 65 वा स्पर्धेच्या थराराची तारीख आणि ठिकाण जाहीर करण्यात आले आहे. महाराष्ट्र कुस्तीगीर परिषदेने यासंदर्भात घोषणा केली आहे. महाराष्ट्र केसरीचा थरार हा पाच दिवस चालणार आहे. यंदाच्या स्पर्धेचा मान हा धाराशिव या जिल्ह्याला मिळाला आहे. यंदा धाराशिवमध्ये केसरी स्पर्धेच आयोजन करण्यात आलं आहे.

कधी आणि कसे होणार सामने?
1 नोव्हेंबर ते 5 नोव्हेंबर पाच दिवस ही स्पर्धा पार पडणार आहे. सर्व जिल्ह्यांमधून 450 खेळाडू माती आणि 450 खेळाडू गादी गटात असे 900 खेळाडू सहभागी होणार आहेत. माती आणि गादी असे 10 वेगवेगळे वजन असे 20 गटात ही स्पर्धा पार पडणार आहे. धाराशिव जिल्ह्याला पहिल्यांदाच महाराष्ट्र केसरी स्पर्धेच्या आयोजनाचा मान मिळाला आहे. धाराशिवमधील तुळजाभवानी स्टेडियममध्ये ही स्पर्धा होणार आहे. आदर्श शिक्षण प्रसारक मंडळ आणि धाराशिव कुस्ती तालीम संघाकडून हे आयोजन करण्यात आला आहे.

जिंकणाऱ्याला काय मिळणार बक्षीस ?
महाराष्ट्र केसरीचा गदा जिंकणाऱ्या पैलवानाला चांदीची मानाची गदा वआणि 30 लाख रुपये किमतीची स्कर्पिओ गाडी मिळणार आहे. द्वितीय बक्षीस महिंद्रा ट्रॅक्टर मिळणार. तसेच 20 गटात स्पर्धा होणार असुन प्रत्येक गटातील प्रथमला बुलेट, रोख पारितोषिक उत्तेजनार्थ 12 लाख बक्षिसे देण्याता येणार आहेत. या स्पर्धेला राज्यातील अनेक नेते वेगवेगळ्या दिवशी उपस्थित राहणार आहेत. दरम्यान, 31 जूनला महाराष्ट्र कुस्तीगीर परिषदेची सर्वसाधारण सभा झाली होती. या सभेत मानाच्या स्पर्धेचं आयोजन हे धाराविव जिल्ह्यात करावं अशी मागणी करण्यात आली होती. अखेर या निर्णयावर शिक्कामोर्तब करण्यात आले आहे.

Share This News
error: Content is protected !!