Chess World Cup 2023

Chess World Cup 2023 : मॅग्नस कार्लसन पुन्हा एकदा वर्ल्ड चॅम्पियन ! अंतिम सामन्यात प्रज्ञाननंदचा पराभव

1395 0

भारताचा ग्रँडमास्टर आर. प्रज्ञानंद इतिहास रचता रचता राहिला आहे. विश्वचषक बुद्धिबळ स्पर्धेतील (Chess World Cup 2023)अंतिम सामन्यात अव्वल मानांकित मॅग्नस कार्लसनने आर. प्रज्ञानंदचा पराभव केला. दोन डाव अनिर्णित राहिल्यानंतर टायब्रेकर डावात मॅग्नस कार्लसनने प्रज्ञानंदला पराभूत करत पुन्हा एकदा वर्ल्ड चॅम्पियनवर नाव कोरले आहे. मॅग्नस कार्लसन अन्नातून विषबाधा झाल्याने अस्वस्थ होता. मात्र त्या स्थितीतही त्याने आर. प्रज्ञानंदला चांगली झुंज दिली. दरम्यान आर. प्रज्ञानंदचा पराभव झाला असला तरी त्याने मॅग्नस कार्लसनला त्याने चांगलीची झुंज दिली. अझरबैजानच्या बाकू या ठिकाणी हा अंतिम सामना पार पडला आहे.

मंगळवार आणि बुधवारी झालेल्या दोन्ही क्लासिक गेम अनिर्णित सुटल्या होत्या, त्यामुळे आज टायब्रेकरमध्ये सामना खेळवण्यात आला. यामध्ये कार्लसन याने बाजी मारली. कार्लसन याला प्रज्ञानानंद यानी कडवी टक्कर दिली. टायब्रेकरमध्ये विजेता ठरवण्यासाठी 25-25 मिनिटांचे दोन सामने खेळवण्यात येतात. यातील पहिला टाय ब्रेकर सामना कार्लसन याने जिंकला होता. दुसरा सामना प्रज्ञानंद याला जिंकाणं अनिवार्य होते. पण पहिल्या सामन्यात विजय मिळवणाऱ्या कार्लसन याचा आत्मविशावस वाढला होता. त्याने दुसऱ्या सामन्यात आपला खेळ आणखी उंचावला, त्याला प्रज्ञानानंद याच्याकडून कडवी टक्कर मिळाली, पण दुसरा सामना अनिर्णित राहिला. अखेर कार्लसन बुद्धिबळाचा नवा विश्वकप विजेता झाला.

Share This News

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!