पॅरिस: पॅरिस ऑलिंपिकमध्ये भारताने चमकदार कामगिरी केली असून मराठमोळ्या कोल्हापूरच्या स्वप्नील कुसाळेनं कांस्यपदकाला गवसणी घातली आहे.
भारताचं पॅरिस ऑलिम्पिकमधील हे तिसरं कांस्य पदक आहे. स्वप्नील कुसाळे हा महाराष्ट्रातील कोल्हापूर येथील कांबळवाडी गावातील असून तो 2012 पासून आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये भारताचे प्रतिनिधित्व करत आहे. आता 12 वर्षांच्या प्रदीर्घ प्रतिक्षेनंतर स्वप्नील कुसाळेने ऑलिम्पिकमध्ये पदार्पण केले आहे.