IPL 2024

IPL 2024 : आयपीएलपूर्वी राजस्थान रॉयल्सला मोठा धक्का ! ‘हा’ खेळाडू स्पर्धेतून बाहेर

855 0

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – आयपीएलचा 17 वा हंगाम (IPL 2024) सुरु व्हायला आता काही दिवसांचा अवधी बाकी राहिला आहे. येत्या 22 मार्चपासून आयपीएलच्या 17 व्या हंगामाला सुरुवात होणार आहे. गतविजेती चेन्नई सुपर किंग्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगलोर यांच्यातील सामन्याने होणार आहे. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सतरा दिवसांचा पहिला टप्पा जाहीर करण्यात आला असून यात 21 सामने खेळवले जाणार आहेत. यादरम्यान राजस्थान रॉयल्सला मोठा धक्का बसला आहे.

राजस्थान रॉयल्सला मोठा धक्का
आयपीएलच्या सुरुवातीलाच राजस्थान रॉयल्सला मोठा धक्का बसला आहे. राजस्थानचा स्टार वेगवान गोलंदाज प्रसिद्ध कृष्णा (Prasidh Krishna) आयपीएलच्या सतराव्या हंगामातून बाहेर पडला आहे. बीसीसीआयने मेडिकल बुलेटिन जारी करत ही माहिती दिली आहे. 23 फेब्रुवारी 2024 ला प्रसिद्ध कृ्ष्णाच्या गुडघ्यावर शस्त्रक्रिया झाली. सध्या तो डॉक्टरांच्या देखरेखीखाली असून लवकरच तो बंगळुरुच्या नॅशनल क्रिकेट अकादमीत सराव सुरु करेल असं बीसीसीआयने म्हटलंय. त्यामुळे प्रसिद्ध कृष्णा आयपीएल 2024 मध्ये खेळणार नाही हे स्पष्ट झालं आहे.

10 कोटींची लागली बोली
2022 च्या हंगामात आयपीएल ऑक्शनमध्ये प्रसिद्ध कृष्णाला लॉटरी लागली होती. प्रसिद्ध कृष्णाची बेस प्राईज 1 कोटी रुपये इतकी होती. पण त्यावेळी त्याचा फॉर्म पाहाता राजस्थान रॉयल्सने त्याला 10 कोटी बोली लावत आपल्या संघात घेतलं. प्रसिद्ध कृष्णाने 2018 मध्ये आयपीएलमध्ये पदार्पण केलं. कोलकाता नाईट रायडर्सने 20 लाख रुपयात त्याला संघात घेतलं होतं. पण केवळ पाच वर्षात प्रसिद्ध कृष्णा 10 कोटी रुपयांपर्यंत पोहोचला. आयपीएल 2022 मध्ये प्रसिद्ध कृष्णा 17 सामने खेळला. यात त्याने 19 विकेट घेतल्या होत्या.

राजस्थान रॉयल्सचा संघ
संजू सॅमसन (कर्णधार), जोस बटलर, शिमरोन हेटमायर, यशस्वी जायसवाल, ध्रुव जुरेल, रियान पराग, डोनोवन फरेरा, कुणाल राठोड, रविचंद्रन अश्विन, कुलदीप सेन, नवदीप सैनी, प्रसिद्ध कृष्णा, संदीप शर्मा, ट्रेंट बोल्ट, युजवेंद्र चहल, एडम जम्पा, अवेश खान, रोवमैन पॉवेल, शुभम दुबे, टॉम कोहलर-कॅडमोर, आबिद मुश्ताक आणि नंद्रे बर्गर

नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.

Vasant More : राज ठाकरेंकडे वेळ मागितली होती, पण…

Heart Attack : हार्ट अटॅक आल्यानंतर ‘हे’ उपाय केल्यास वाचू शकतो जीव

Helicopter Crash : हॉस्टेलवर कोसळलं सैन्यदलाचं फायटर हेलिकॉप्टर; Video आला समोर

Vasant More : ‘….अपमान किती सहन करायचा’, ‘मनसे’चा राजीनामा दिल्यानंतर वसंत मोरेंनी दिली ‘ही’ प्रतिक्रिया

IPL : IPL 2024 पूर्वी BCCI कडून खेळाडूंची फिटनेस अपडेट जारी

Vasant More : वसंत मोरे यांचा मनसेला जय महाराष्ट्र!

Murlidhar Mohol : ‘जलने वालो को खबर कर दो, अब हम ट्रेंडिंग मे आ रहै है’; मुरलीधर मोहोळ यांचा नेमका रोष कोणावर?

Manohar Lal Khattar : हरियाणामध्ये राजकीय भूकंप ! मनोहरलाल खट्टर यांचा राजीनामा

Vasant More : मर्यादेबाहेर त्रास सहन केला…; वसंत मोरेंच्या ‘त्या’ पोस्टने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण

Pankaj Khelkar Pass Away : पत्रकार पंकज खेळकर यांचे निधन

Balasana : बालासन म्हणजे काय? त्याचे काय आहेत फायदे?

Share This News

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!