पुणे : आज राजकीय वर्तुळातून एक मोठी बातमी समोर आली. यामध्ये मनसेचे नेते वसंत मोरे (Vasant More) यांनी पक्षाला जय महाराष्ट्र केला आहे. यामुळे मनसेला मोठा धक्का बसला आहे. वसंत मोरे यांनी पक्षांतर्गत गटबाजीवर नाराजी व्यक्त करत पक्ष सोडत असल्याचे आपल्या राजीनाम्यात म्हंटले आहे. मनसे पक्षाच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिल्यानंतर वसंत मोरे यांनी पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत ते भावुक झाल्याचे पाहायला मिळाले.
वसंत मोरे काय म्हणाले?
सुरूवातीच्या काळामध्ये मी शिवसेनेत राज ठाकरेंसोबत काम केलं. राज ठाकरेंनी शिवसेनेचा राजीनामा दिला होता. त्यावेळी मी सुद्धा राजीनामा दिला होता. माझं स्वत:चं जे काही करिअर आहे, ते राज ठाकरेंमुळेच आहे. मी माझ्या सदस्यपदाचा आणि मी माझ्या सर्व पदाचा राजीनामा दिला आहे. कारण गेलं दीड वर्षांपासून पुण्यात लोकसभा निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक आहे. पण वारंवार माझ्या पक्षातील काही पदाधिकारी जे इच्छुक नव्हते, पण आता इच्छुक उमेदवारांची यादी वाढत चालली आहे.
आपण मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याकडे वेळ मागितली होती. पण साहेब मला काही बोलले नाही . पक्षात अशा प्रकारचं राजकारण होत असेल तर तिथं राहून काही फायदा नाही. राजसाहेबांशी माझा वाद नव्हता, पक्षासोबतही वाद नव्हता, पण काही पदाधिकाऱ्यांमुळे वाद होता. त्यांनी पक्षाचं वाटोळं केलं आहे. मी रात्रभर झोपलो नाही, मला कुणी काहीच विचारलं नाही. आता राजीनामा दिल्यावर विचारत आहे. मी निवडणूक लढवणे हा काय माझा गुन्हा आहे का? पक्ष वाढवण्यासाठी मागणी केली तर काय चुकलं? असे प्रश्न वसंत मोरे यांनी यावेळी विचारले.
मागील महिन्यात राज ठाकरेंनी यादी मागितली होती, त्यामध्ये पुण्याची परिस्थितीत नाजूक असल्याची माहिती राज ठाकरेंकडे देण्यात आली. या लोकांनी पक्षासाठी परिस्थितीत निगेटिव्ह असल्याची माहिती राज ठाकरेंकडे पोहोचवली होती. वसंत मोरेला तिकीट मिळू नये, जबाबदारी देऊ नये अशी माहिती राज ठाकरेंकडे दिली. त्यामुळए मी आज राजीनामा दिला आहे. माझ्या परतीचे दोर मी माझ्या हाताने कापले आहेत असंही वसंत मोरे म्हणाले.
मला अनेक लोकांचे फोन आले, मी सर्व सामान्य कार्यकर्त्यांचे फोन घेतले, पण नेत्यांचे फोन घेतले नाही. माझी तडफड तुम्हाला दिसली नाही का? जे आज मला फोन करत आहात. वसंत मोरे स्वत: साठी कधीच लढला नाही. जे पदाधिकारी माझ्यासोबत आहे, ज्यांनी माझ्यासाठी कार्यक्रम घेतले, अशा लोकांवर चुकीच्या कारवाया होत असेल. त्यांची पदं काढली जात असेल, तर अशा पक्षात राहुन काय, करायचं? असा प्रश्न वसंत मोरे यांनी पत्रकार परिषदेत विचारला.
नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.
Heart Attack : हार्ट अटॅक आल्यानंतर ‘हे’ उपाय केल्यास वाचू शकतो जीव
Helicopter Crash : हॉस्टेलवर कोसळलं सैन्यदलाचं फायटर हेलिकॉप्टर; Video आला समोर
IPL : IPL 2024 पूर्वी BCCI कडून खेळाडूंची फिटनेस अपडेट जारी
Vasant More : वसंत मोरे यांचा मनसेला जय महाराष्ट्र!
Manohar Lal Khattar : हरियाणामध्ये राजकीय भूकंप ! मनोहरलाल खट्टर यांचा राजीनामा