Virat Kohli

विराट कोहलीचा वर्ल्ड रेकॉर्ड! ‘ही’ कामगिरी करणारा ठरला पहिला क्रिकेटपटू

1410 0

जयपूर : यंदाच्या आयपीएलमधील (IPL) 60 वा सामना राजस्थान रॉयल्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु (RCB) यांच्यात पार पडत आहे. हा सामना दोन्ही संघांसाठी खूप महत्वपूर्ण असणार आहे. या सामन्यात विराट कोहलीच्या (Virat Kohli) नावावर एका मोठ्या विक्रमाची नोंद झाली आहे. अशी कामगिरी करणारा तो वर्ल्डमधील पहिला खेळाडू ठरला आहे. आजच्या सामन्यात मैदानात उतरताच त्याने हा विक्रम केला आहे.

काय आहे तो विक्रम?
विराट कोहली टी 20 क्रिकेटमध्ये एका टीमकडून 250 सामने खेळणारा पहिला खेळाडू ठरला आहे. विराट आरसीबीसाठी 250 वा सामना खेळणाारा खेळाडू ठरला आहे. विराट आयपीएलच्या सुरुवातीपासून आरसीबीसाठी खेळत आहे. विराटने आयपीएलमध्ये आरसीबीचं 235 सामन्यात प्रतिनिधित्व केलं आहे. तर उर्वरित 15 सामने त्याने चॅम्पियन लीग टी 20 स्पर्धेत खेळले आहेत. विराट नंतर एका टीमसाठी सर्वाधिक सामने खेळण्याचा विक्रम हा चेन्नई सुपर किंग्सचा (CSK) कर्णधार महेंद्रसिंह धोनी (Mahendrasingh Dhoni) याच्या नावावर आहे.

आजच्या सामन्यासाठी दोन्ही संघाची प्लेइंग 11
राजस्थान रॉयल्स प्लेइंग इलेव्हन | संजू सॅमसन (कॅप्टन आणि विकेटकीपर), यशस्वी जयस्वाल, जोस बटलर, जो रूट, ध्रुव जुरेल, शिमरॉन हेटमायर, रविचंद्रन अश्विन, अ‍ॅडम झम्पा, संदीप शर्मा, केएम आसिफ आणि युझवेंद्र चहल.

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु प्लेइंग इलेव्हन | फाफ डू प्लेसिस (कॅप्टन), विराट कोहली, अनुज रावत, ग्लेन मॅक्सवेल, महिपाल लोमरोर, दिनेश कार्तिक (विकेटकीपर), मायकेल ब्रेसवेल, वेन पारनेल, कर्ण शर्मा, हर्षल पटेल आणि मोहम्मद सिराज.

Share This News
error: Content is protected !!