Royal-Challengers-Bangalore-RCB

…तर माझा मृत्यू झाला असता; RCB च्या ‘या’ खेळाडूचा मोठा खुलासा

709 0

मुंबई : रॉयल चॅलेंजर्स बँगलोर (Royal Challengers Bangalore) संघाचा महत्वाचा खेळाडू मोहम्मद सिराजने (Mohammad Siraj) एका मुलाखतीदरम्यान एक मोठा खुलासा केला आहे. मोहम्मद सिराजने सांगितले कि तो मृत्यूच्या दारातून परत आला आहे. सिराजने सांगितले कि मला डेंग्यु (Dengue) झाला होता आणि प्लेटलेट्स वेगाने कमी होत होत्या. पुढच्याच दिवशी अंडर 23 संघ रवाना होणार होता. मी तणावात इकडे तिकडे फिरत होतो.

माझं नाव संघात होतं पण मी रुग्णालयात होतो. मला डेंग्युची लक्षणे दिसत होती. माझ्या रक्त पेशीही कमी झाल्या होत्या. त्या दिवशी जर मी हॉस्पिटलमध्ये दाखल झालो नसतो तर माझा त्यावेळी मृत्यू झाला असता असा धक्कादायक खुलासा त्याने केला आहे. मोहम्मद सिराज यंदाच्या हंगामात जबरदस्त फॉर्ममध्ये दिसत आहे. त्याने 11 सामन्यात 15 विकेट घेतल्या आहेत. सर्वाधिक निर्धाव चेंडू टाकणाऱ्या गोलंदाजांमध्ये तो टॉपला आहे.

Share This News
error: Content is protected !!