Rohit Sharma

Rohit Sharma : पुणे पोलिसांनी रोहित शर्माला ठोठावला दंड; ‘ती’ चूक पडली महागात

980 0

पुणे : भारताचा कर्णधार रोहित शर्माला (Rohit Sharma) पुणे पोलिसांनी दंड ठोठावल्याची घटना समोर आली आहे. मुंबई एक्स्प्रेस हायवेवर भरधाव वेगात गाडी चालवणे त्याचा अंगलट आले आहे. कर्णधार रोहित शर्माने एकाच दिवशी दोन वेळेस नियमांचा भंग करत भरधाव वेगात कार चालवल्याचे समोर आलं आहे. पुण्यात भारत विरुद्ध बांगलादेश हा क्रिकेट सामना असल्याने रोहित शर्मा मुंबईहुन पुण्याच्या दिशेने येत होता. त्यावेळी रोहित शर्माने भरधाव वेगाने गाडी चालवली. त्यावेळी भरधाव वेगात असलेली कार सीसीटीव्हीत कैद झाली. त्यामुळे रोहित शर्माला पुणे पोलिसांकडून दंड आकारण्यात आला आहे.

गहुंजे स्टेडियमवर बांगलादेशविरुद्ध खेळण्यासाठी मंगळवारी दुपारी मुंबईहून पुण्याला जात असताना भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार रोहित शर्मा याला दोन वेळा ओव्हरस्पीडिंग केल्याबद्दल दंड ठोठावण्यात आला आहे. महामार्ग पोलिसांच्या म्हणण्यानुसार, रोहितच्या लॅम्बोर्गिनीने उरुसने मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर 105 किमी प्रतितास ही परवानगी असलेली वेग मर्यादा दोनदा ओलांडली. महामार्ग पोलिसांनी प्रत्येक उल्लंघनासाठी त्याला 4000 रुपये दंड ठोठावला आहे.

रोहित शर्मा याच्या कारने कामशेत बोगद्याजवळ दुपारी 2.54 वाजता पहिल्यांदा वेग मर्यादा ओलांडली. कामशेत बोगद्याजवळ वेग मर्यादा 105 किलोमीटर प्रतितास (किमी) आहे. पण इथे रोहित शर्माच्या गाडीचा वेग येथे 117 किमी प्रति तास होता. काही वेळाने सोमाटणे फाट्याजवळ पुन्हा वेगमर्यादा ओलांडून 111 किमी प्रतितास इतकी झाली होती.

Share This News
error: Content is protected !!