Dutee Chand Banned

Dutee Chand Banned : भारतीय महिला धावपटू दुती चंदवर डोपिंग प्रकरणी 4 वर्षांची बंदी

1160 0

मुंबई : भारताची स्टार महिला धावपटू दुती चंद (Dutee Chand Banned)ला मोठा धक्का बसला आहे. ती डोपिंग टेस्टमध्ये दोषी आढळली आहे. प्रतिबंधित पदार्थांच्या सेवनामुळे तिच्यावर चार वर्ष निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. दुतीच्या डोपिंग टेस्टमध्ये सिलेक्टिव एंड्रोजन रिसेप्टर मॉड्यूलेटर हा प्रतिबंधित पदार्थ आढळला होता. त्यानंतर तिचं तात्पुरतं निलंबन करण्यात आलं होतं. आता तिच्यावर चार वर्षांची बंदी घालण्यात आली आहे.

भारतीय महिला धावपटू दुती चंदला मोठा झटका
दुती चंदने आशियाई स्पर्धेमध्ये भारताला विजय मिळवून दिला आहे. दुतीने 2021 साली ग्रां प्रीमध्ये 100 मीटर स्पर्धा 11.17 सेकंदात पूर्ण करत राष्ट्रीय विक्रम रचला होता. आता तिच्यावर बंदी घालण्यात आली आहे. भारतीय अ‍ॅथलीट दुती चंदवरील बंदी जानेवारी 2023 पासून ग्राह्य धरली जाणार आहे. दुतीच्या पहिल्या नमुन्यात अँडारिन, ऑस्टारिन आणि लिंगंड्रोल आढळले आहेत. दुसऱ्या नमुन्यात अँडारिन आणि ऑस्टारिन हे प्रतिबंधित पदार्थ आढळून आले.

दुती चंदला जागतिक स्पर्धेत सुवर्ण पदक
दुती चंद ही भारतातील स्टार महिला धावपटूंपैकी एक आहे. दुती चंद ही जागतिक स्पर्धेत सुवर्णपदक जिंकणारी पहिली भारतीय महिला धावपटू आहे. तिने आशियाई गेम्समध्ये 2018 मध्ये 100 मीटर आणि 200 मीटर स्पर्धेत सुवर्णपदक जिंकलं आहे.

जानेवारी 2023 पासून चार वर्षांची बंदी
नॅशनल अँटी डोपिंग एजन्सीने या वर्षी जानेवारीमध्ये दुतीला निलंबित केलं होतं. यामुळे ती आतापर्यंतच्या सर्व स्पर्धांमधून बाहेर पडली होती. 5 डिसेंबर 2022 रोजी भुवनेश्वरमध्ये दुतीची चाचणी घेण्यात आली होती. यामध्ये दुती पॉझिटिव्ह आली होती. जानेवारी 2023 मध्ये दुती चंदवर तात्पुरत्या निलंबनाची कारवाई करण्यात आली होती.

Share This News
error: Content is protected !!