Mohammed Shami

IND Vs RSA 2nd Test : फिटनेस टेस्टमध्ये शमी अपयशी; त्याच्या जागी ‘या’ खेळाडूचा संघात समावेश

681 0

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कसोटी मालिकेतील दुसऱ्या सामन्यासाठी (IND Vs RSA 2nd Test) वेगवान गोलंदाज आवेश खानचा (Avesh Khan) भारतीय संघात समावेश करण्यात आला आहे. मोहम्मद शमीला (Mohammed Shami) दुखापत झाल्यामुळे तो दुसरा कसोटी सामना खेळू शकणार नाही. त्यामुळे बीसीसीआयने हा निर्णय घेतला आहे.

फिटनेस टेस्टमध्ये शमी अपयशी
मोहम्मद शमीची दक्षिण आफ्रिका दौऱ्यासाठी निवड करण्यात आली होती. मात्र, फिटनेस टेस्ट पास करण्यामध्ये त्याला अपयश आले. शमी दुखापतीमुळे सेंच्युरियनच्या मैदानावर खेळवला जात असलेल्या सामन्यालाही मुकला होता. शमीच्या जागी आवेश खानचा संघात समावेश करण्यात आला आहे. त्यामुळे आता आवेश खान कशी कामगिरी करतो? याकडे सर्वांचे लक्ष असणार आहे. आफ्रिकेविरुद्धचा दुसरा कसोटी सामना 3 जानेवारी ते 7 जानेवारीदरम्यान खेळवण्यात येणार आहे. हा सामना केपटाऊनच्या मैदानावर होणार आहे.

आफ्रिकेविरुद्धच्या दुसऱ्या कसोटीसाठी भारतीय संघ
रोहित शर्मा (कर्णधार), विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल (यष्टीरक्षक), रविचंद्रन अश्विन, रवींद्र जाडेजा, शार्दुल ठाकूर, मोहम्मद सिराज, मुकेश कुमार, जसप्रीत बुमराह (उपकर्णधार), प्रसिद्ध कृष्णा, केएस भरत (यष्टीरक्षक), अभिमन्यू ईश्वरन, आवेश खान.

नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.

Karnatak News : शाळेच्या सहलीत मुख्याध्यापिकेने विद्यार्थ्यासोबत केले अश्लील चाळे; पालकांनी व्यक्त केला संताप

Yavatmal Crime : यवतमाळ मेडिकल कॉलेजमध्ये MBBS विद्यार्थीनीने उचलले टोकाचे पाऊल

Flight Cancelled : खराब हवामानामुळे पुण्यातून दिल्ली, हैदराबाद, गोव्याकडे जाणारी 14 विमाने रद्द

Pune Transport : पुण्यात 1 जानेवारी निमित्त वाहतुकीत होणार ‘हा’ मोठा बदल

Pune Crime : पुण्यातील येरवडा जेलमध्ये कैद्याची निर्घृणपणे हत्या

Pune Video : पुण्यात कुऱ्हाड गँग सक्रीय ! कुऱ्हाडीने बेदम मारहाण करत आरोपींनी ग्राहकांना लुटलं

Pune News : किल्ला बनवा स्पर्धेतील विजेत्यांसाठी गडकोट किल्ल्यांची मोहिम चंद्रकांतदादा पाटील यांची घोषणा

Thane News : खळबळजनक ! ठाण्यात ज्यू धर्मियांच्या प्रार्थनास्थळाजवळ बॉम्ब ठेवल्याचा धमकीचा मेल

Maratha Reservation : जरांगे पाटलांचा मुंबई मोर्चाचा मार्ग ठरला

Pune News : पुण्यात आईच्या डोळ्यादेखत डंपरने लेकराला चिरडले; संतप्त जमावाने डंपर पेटवला

Madhya Pradesh Accident : बस आणि डंपरचा भीषण अपघात,12 जणांचा मृत्यू

Share This News

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!