Team India

IND vs BAN : बांगलादेश विरुद्धच्या सामन्यात टीम इंडियाची कशी असेल प्लेईंग 11?

798 0

पुणे : आयसीसी वन-डे क्रिकेट वर्ल्ड कप 2023 स्पर्धेतील 17 वी मॅच भारत आणि बांगलादेश यांच्यामध्ये (IND vs BAN) गुरुवारी, 19 ऑक्टोबर 2023 रोजी पुण्यातील महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या गहुंजे येथील स्टेडियमवर होणार आहे. या मैदानावर 9 महिन्यांनंतर आंतरराष्ट्रीय मॅच खेळवली जात आहे. आज टीम इंडिया चौथ्या सामन्यात विजय मिळवून विजयी वाटचाल कायम ठेवण्याचा प्रयत्न करेल . यामुळे भारताला उपांत्य फेरीत पोहोचण्यास मदत होईल. तर, बांगलादेश संघ भारताचा पराभव करून स्पर्धेत आपले स्थान टिकवण्याचा प्रयत्न करेल.

बांगलादेशविरुद्धच्या सामन्यात सिराजला विश्रांती दिली जाऊ शकते आणि शमीला प्लेइंग इलेव्हनमध्ये स्थान दिले जाऊ शकते, अशी शक्यता वर्तवली जात आहे. पण, सिराज सध्या उत्कृष्ट फॉर्ममध्ये असल्याने त्याला बाहेर ठेवणं संघासाठी सोपं नाही. शमीची गुणवत्ता लक्षात घेता, त्याला बाहेर ठेवण्याचा निर्णय घेणे खूप कठीण आहे.

रविचंद्रन अश्विनने ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या विश्वचषकाच्या सलामीच्या सामन्यात शानदार गोलंदाजी करत 10 षटकात 34 धावा देत एक बळी घेतला. असे असलं तरी त्याला अफगाणिस्तान आणि पाकिस्तानविरुद्धच्या सानन्यात संधी देण्यात आली नव्हती. दुसरीकडे अश्विनच्या जागी संधी मिळालेल्या शार्दुल ठाकूरला एक विकेटही मिळवता आलेली नाही. त्यामुळे रोहित या दोघांपैकी कोणाला संधी देणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

बांगलादेशविरुद्ध टीम इंडियाची संभाव्य प्लेइंग इलेव्हन
रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल, हार्दिक पंड्या, रवींद्र जडेजा, कुलदीप यादव, रविचंद्रन अश्विन, मोहम्मद सिराज, जसप्रीत बुमराह.

Share This News
error: Content is protected !!