Jasprit Bumrah

IND vs AUS: बुमराहने रचला इतिहास ! अशी कामगिरी करणारा ठरला पहिला भारतीय

1342 0

चेन्नई : वृत्तसंस्था – एकदिवसीय विश्वचषक 2023 (IND vs AUS) मधील पाचवा सामना आज टीम इंडिया आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात खेळवला जात आहे. चेन्नईच्या एमए चिदंबरम स्टेडियमवर टीम इंडियाने शानदार कामगिरी केली. या सामन्यात भारताचा हुकमी एक्का जसप्रीत बुमराहने एक मोठा विक्रम आपल्या नावावर केला आहे. जो या अगोदर कोणत्याच भारतीयाला जमला नव्हता.

काय आहे तो विक्रम?
बुमराहने ऑस्ट्रेलियाचा सलामीवीर मिचेल मार्शला शून्यावर बाद करत टीम इंडियासाठी इतिहास रचला.29 वर्षीय बुमराह वर्ल्ड कपमध्ये ऑस्ट्रेलियन सलामीवीराला शून्यावर बाद करणारा टीम इंडियाचा पहिला गोलंदाज ठरला आहे. बुमराहपूर्वी विश्वचषकात ऑस्ट्रेलियन सलामीवीराला शून्यावर बाद करण्याचा पराक्रम कोणत्याही भारतीय गोलंदाजाला करता आला नव्हता. विराट कोहलीने मार्शचा अप्रतिम झेल घेतला.

विश्वचषकासाठी भारतीय संघ
रोहित शर्मा (कर्णधार), हार्दिक पंड्या (उपकर्णधार), शुभमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल, रवींद्र जडेजा, शार्दुल ठाकूर, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज, कुलदीप यादव, मोहम्मद शमी, रविचंद्रन अश्विन, इशान किशन, सूर्यकुमार यादव.

Share This News
error: Content is protected !!