ind vs pak

वर्ल्डकपसाठी भारतात येण्यापूर्वी पाकिस्तानने ठेवली ‘हि’ अट

3538 0

मुंबई : यंदाचा एकदिवसीय विश्वचषक 2023 हा भारतात पार पडणार आहे. तर यंदाचा आशिया चषक 2023 पाकिस्तानमध्ये होणार आहे. मात्र भारताने आशिया चषकसाठी पाकिस्तानमध्ये जाण्यास नकार दिला आहे. यानंतर पाकिस्तानने त्यांचा संघ एकदिवसीय विश्वचषक 2023 साठी भारतात येणार नाही अशी धमकी दिली. त्यातच आता पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे चेअरमन नजम सेठी यांनी एक वक्तव केले आहे.

काय म्हणाले नजम सेठी?
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, नजम सेठी 8 मे रोजी दुबईला रवाना होणार आहेत, जिथे ते ACC आणि ICC अधिकार्‍यांसोबत बैठक घेणार आहेत. दुबईच्या भेटीदरम्यान सेठी यांनी पाकिस्तानला पाठिंबा मिळवण्यासाठी लॉबिंग सुरू करण्याचीही अपेक्षा आहे. त्यांच्या मते 2025 च्या चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये भारताच्या सहभागाबाबत बीसीसीआय आणि आयसीसी लेखी हमी देत ​​नाही तोपर्यंत पाकिस्तान आपले विश्वचषक सामने भारतात खेळणार नाही अशी अट ठेवणार आहेत.

यंदाचा वनडे विश्वचषक ऑक्टोबर आणि नोव्हेंबरमध्ये भारतात पार पडणार आहे. या विश्वचषकात पाकिस्तानच्या सामन्यासाठी BCCI ने अहमदाबाद, चेन्नई, बेंगळुरू आणि कोलकाता ही मैदाने निवडली आहेत. एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेत भारत आणि पाकिस्तान यांच्यात आतापर्यंत 7 सामने खेळले गेले आहेत, ज्यामध्ये भारताने पाकिस्तानवर एकतर्फी वर्चस्व मिळवले आहे. भारताने 1983 आणि 2011 मध्ये एकदिवसीय विश्वचषक जिंकला आहे तर पाकिस्तानने इम्रान खानच्या नेतृत्वाखाली 1992 मध्ये विश्वचषक जिंकला होता.

Share This News

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!