Team India

Cricket : ICC रँकिंगमध्ये भारताने टी20 अन् टेस्टमध्ये मारली बाजी मात्र वनडेत ‘या’ संघाने मारली बाजी

1440 0

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – पाकिस्तानने अफगाणिस्तानविरुद्धचा तिसरा एकदिवसीय सामना (Cricket) 59 धावांनी जिंकला आणि या विजयासह त्यांनी तीन सामन्यांची एकदिवसीय मालिका (Cricket) 3-0 ने खिशात टाकली. त्यांना या विजयाचा मोठा फायदा असून त्यांनी थेट वनडे रँकिंगमध्ये जबरदस्त झेप घेत अव्वल स्थान पटकावलं आहे. ऑस्ट्रेलिया आणि पाकिस्तानचे समान गुण असूनही अवघ्या काही पॉइंटच्या फरकाने पाकिस्तान अव्व्ल स्थानी विराजमान झाले आहेत.

पाकिस्तानचा संघ 23 एकदिवसीय सामन्यात 118 रेटिंग गुणांसह वनडेमध्ये पहिल्या स्थानी आहे. तर ऑस्ट्रेलियाचेही 118 गुण आहेत. मात्र ते दुसऱ्या स्थानी आहेत. अवघ्या काही पॉइंटमुळे ऑस्ट्रेलिया मागे पडले. तर तिसऱ्या क्रमांकावर भारतीय संघ असून भारताचे 113 रेटिंग गुण आहेत. पाकिस्तानला आता नंबर वनवर रहायचे असेल तर आशिया कप जिंकावा लागेल. तरच त्यांना अव्वल स्थान अबाधित ठेवता येईल.

तर दुसरीकडे कसोटी आणि टी20 रँकिंगमध्ये भारतीय संघाने बाजी मारली आहे. भारताने 29 कसोटी सामन्यात 118 रेटिंग गुण मिळवले आहेत. तर दुऱ्या स्थानी ऑस्ट्रेलिया आणि तिसऱ्या स्थानी इंग्लंड आहे. टी20 रँकिंगमध्येही भारत पहिल्या क्रमांकावर आहे. भारताने 49 सामन्यात 264 रेटिंग गुण मिळवले आहेत. तर इंग्लंड दुसऱ्या आणि न्यूझिलंड तिसऱ्या स्थानावर आहे.

Share This News
error: Content is protected !!