ICC Ranking

ICC Ranking : आयसीसीकडून वनडे फलंदाजीची क्रमवारी जाहीर !

24167 0

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – विश्वचषकाचा रनसंग्राम सुरु असतानाच आयसीसीने वनडे फलंदाजीची क्रमवारी (ICC Ranking) जारी केली आहे. ताज्या क्रमवारीनुसार, केएल राहुल आणि विराट कोहली यांना मोठा फायदा झाला आहे. ऑस्ट्रेलियाविरोधातील खेळीचा त्यांना फायदा झाला आहे. या क्रमवारीत भारताचा कर्णधार रोहित शर्माला एका गुणांचा फटका बसला आहे. या क्रमवारीनुसार टॉप 10 मध्ये फक्त शुभमन गिल आणि विराट कोहली यांना स्थान मिळाले आहे.

ऑस्ट्रेलियाविरोधात दमदार 85 धावांची खेळी करणाऱ्या विराट कोहलीला गुणतालिकेत फायदा झाला आहे. विराट कोहली दोन क्रमांकाची बढती मिळाली आहे. विराट कोहली आता सातव्या स्थानावर विराजमान झाला आहे. विराट कोहलीच्या नावावर 715 अंक आहेत. तर रोहित शर्माची 11 व्या क्रमांकावर घसरण झाली आहे. तर शुभमन गिल दुसऱ्या क्रमांकावर कायम आहे. पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझम अव्वल स्थानावर आहे. बाबर आझम याला दोन्ही सामन्यात मोठी खेळी करता आली नाही. त्यामुळे शुभमन गिल आणि बाबर यांच्यातील अंतर फक्त 5 गुणांचे राहिले आहे. तसेच ऑस्ट्रेलियाविरोधात नाबाद 97 धावांची खेळी करणाऱ्या केएल राहुल याला 15 अंकाचा फायदा झाला त्याने 19 व्या स्थानावर झेप घेतली आहे.

आयसीसीच्या वनडे क्रमवारीनुसार टॉप 10 फलंदाज
बाबर आझम
शुभमन गिल
रास वॅन डुसेन
हॅरी ट्रक्टर
डेविड वॉर्नर
क्विंटन डिकॉक
विराट कोहली
डेविड मलान
इम्मा उल हक
हेनरिक क्लासेन

Share This News
error: Content is protected !!