virender sehwag

ICC Hall of Fame : सेहवागसह ‘या’ 3 दिग्गजांचा ICCच्या हॉल ऑफ फेममध्ये समावेश

636 0

मुंबई : आयसीसीच्या हॉल ऑफ फेममध्ये (ICC,Hall of Fame) तीन दिग्गज क्रिकेटर्सचा समावेश करण्यात आला आहे. यामध्ये भारताचा माजी सलामीवीर विरेंद्र सेहवागचा समावेश आहे. तसंच भारताची माजी महिला क्रिकेटपटू डायना इडुल्जी आणि श्रीलंकेचा क्रिकेटर अरविंदा डिसिल्वा यांचीही नावे आहेत. भारताचे अनेक खेळाडू आधीपासूनच आयसीसीच्या हॉल ऑफ फेममध्ये आहेत. यात सचिन तेंडुलकर, राहुल द्रविड यांसारखे दिग्गज क्रिकेटर आहेत.

आंतरराष्ट्रीय क्रिकेट काउन्सिलने सोमवारी आयसीसी हॉल ऑफ फेममध्ये नव्याने समाविष्ट करण्यात आलेल्या नावांची घोषणा केली. यात विरेंद्र सेहवाग, डायना इडुल्जी आणि अरविंद डिसिल्वा यांची नावे आहेत. निवृत्तीनंतर 7 वर्षांनीच क्रिकेटर्सना या यादीत समाविष्ट केलं जातं. यामुळेच सेहवागचा या यादीत उशिरा समावेश झाला.

हॉल ऑफ फेममध्ये समावेश झालेली डायना देशाची पहिलीच महिला क्रिकेटर ठरली. डायना इडुल्जी ही निवडक महिला क्रिकेटर्सपैकी एक आहे ज्यांचा हॉल ऑफ फेममध्ये समावेश झालाय. याअगोदर फक्त भारताच्या पुरुष क्रिकेटपटुंचा यामध्ये समावेश झाला आहे.

नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.

Share This News
error: Content is protected !!
WhatsApp

WhatsApp

1
Join Us On WhatsApp 😊.
Hide