marlon samuels

ICC ची मोठी कारवाई! ‘या’ वर्ल्ड चॅम्पियन खेळाडूवर घातली 6 वर्षांची बंदी

833 0

आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद म्हणजेच ICC ने भ्रष्टाचाराविरोधात मोठं पाऊल उचललं आहे. आयसीसीने वेस्ट इंडिजचा माजी क्रिकेटर मार्लोन सॅम्युअल्सवर 6 वर्षाची बंदी घातली आहे. सॅम्युअल्स हा एमिरेट्स क्रिकेट बोर्डाच्या भ्रष्टाचारविरोधी नियमांचं उल्लंघन केल्याप्रकरणी दोषी आढळून आला आहे. आयसीसीने गुरुवारी याची घोषणा केली आहे.

काय आहे नेमके प्रकरण?
आयसीसीने सप्टेंबर 2021 मध्ये सॅम्युअल्सवर आरोप लावले होते. यानुसार सॅम्युअल्सने एमिरेट्स क्रिकेट बोर्डाच्या भ्रष्टाचारविरोधी कलम 2.4.2, 2.4.3 , 2.4.6 आणि 2.4.7 चं उल्लंघन केलं होतं. ही कलमं भ्रष्टाचारविरोधी अधिकार्‍यांना भेटवस्तू, पैसे, आदरातिथ्य किंवा इतर गोष्टींचा अहवाल न देण्यासंदर्भात आहेत, ज्यामुळे खेळाची प्रतिमा खराब होऊ शकते. यासोबतच तपासात सहकार्य न करणे, माहिती लपवून तपासात अडथळा आणणे किंवा विलंब करणे आदी कलमांचाही संबंध आहे. यावर्षी ऑगस्ट महिन्यात सॅम्युअल्स या सर्व आरोपांमध्ये दोषी आढळला.

मार्लोन सॅम्युअल्सची कारकीर्द
सॅम्युअल्सने वेस्ट इंडिजसाठी 71 कसोटी, 207 एकदिवसीय आंतरराष्ट्रीय आणि 67 टी-20 आंतरराष्ट्रीय सामने खेळले. त्‍याच्‍या नावे तिन्ही आंतरराष्‍ट्रीय प्रकारात 17 शतकांसह 11,134 धावा आहेत. त्याने 152 आंतरराष्ट्रीय विकेट्सही घेतल्या आहेत. यादरम्यान, त्याने एकदिवसीय सामन्यात वेस्ट इंडिज संघाचे नेतृत्वही केले. सॅम्युअल्सने 2012 आणि 2016 च्या टी-20 वर्ल्ड कपमध्ये वेस्ट इंडिजला चॅम्पियन बनवण्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. सॅम्युअल्स दोन्ही T20 विश्वचषक फायनलमध्ये सामनावीर ठरला होता.

नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.

Deepfake Technology : गेल्या काही दिवसांपासून चर्चेत असलेले डीपफेक तंत्रज्ञान नेमके काय आहे?

IRCTC ची वेबसाईट ठप्प; तिकीट बुकिंग करताना येत आहेत अडचणी

KBC 15 : एक चुक पडली 97 लाखांना! विराटचा ‘विराट’ विक्रम थोडक्यात हुकला

Accident News : दुभाजकाला धडकून कारचा भीषण अपघात

Milk : दूध पिण्याची योग्य वेळ कोणती?

Kolhapur Accident : गोव्याहून मुंबईला येणाऱ्या ट्रॅव्हल्सचा कोल्हापुरात भीषण अपघात

Share This News

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!