Bishan Singh Bedi Passed Away

Bishan Singh Bedi Passed Away : भारताचे माजी फिरकीपटू बिशन सिंग बेदी यांचं निधन

996 0

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – भारतामध्ये सध्या वर्ल्ड कप 2023 खेळवला जात आहे. यादरम्यान भारतीय क्रीडा विश्वातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. भारताचे माजी आणि ज्येष्ठ फिरकीपटू बिशन सिंग बेदी यांचं निधन (Bishan Singh Bedi Passed Away) झालं आहे. 1970 च्या दशकामध्ये आपल्या फिरकी गोलंदाजीसाठी प्रसिद्ध असलेल्या ग्रेट चौघांमध्ये बिशन सिंग बेदी यांचा समावेश होता. बिशन सिंग बेदींबरोबरच प्रसन्ना, चंद्रशेखर आणि राघवन यांचा या सर्वोत्तम 4 फिरकीपटूंमध्ये समावेश होता.

बिशन सिंग बेदी यांची कारकीर्द
बिशन सिंग बेदींचा जन्म 25 सप्टेंबर 1946 अमृतसरमध्ये झाला. ते डाव्या हाताने उत्तम फिरकी गोलंदाजी करायचे. 1966 ते 1979 दरम्यान ते भारतीय कसोटी टीमचा ते हिस्सा होते. बिनश सिंग बेदींनी 22 कसोटी सामन्यांमध्ये भारताचे कर्णधारपददेखील भूषवले होते. त्यांनी 67 कसोटी सामन्यांमध्ये 266 विकेट्स घेतल्या. आपल्या प्रथम श्रेणी क्रिकेट कार्किर्दीमध्ये त्यांनी 1560 विकेट्स घेतल्या होत्या.

Share This News
error: Content is protected !!