Final Match

महिलेने भर स्टेडियममध्ये पोलिसाच्या कानाखाली वाजवली (Video)

456 0

अहमदाबाद : नरेंद्र मोदी स्टेडियम (Narendra Modi Stadium) हे जगातील सर्वात मोठ स्टेडियम आहे. काल या स्टेडियममध्ये गुजरात टायटन्स (Gujarat Titans) आणि चेन्नई सुपर किंग्स (Chennai Super Kings) या दोन टीम्समध्ये IPL 2023 ची फायनल मॅच खेळवण्यात येणार होती. हे स्टेडियम संपूर्ण पूर्ण भरले होते. काल पावसामुळे या दोन्ही संघातील सामना होऊ शकला नाही मात्र यादरम्यान स्टेडियममध्ये एक संतापजनक घटना घडली.

काय घडले नेमके?
रविवारी स्टेडियममध्ये क्रिकेटरसिक फायनल मॅचच्या प्रतिक्षेत असताना एक अप्रिय घटना घडली. यामध्ये क्रिकेटचा सामना पाहायला आलेल्या एका महिलेने नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये सुरक्षेसाठी तैनात असलेल्या पोलिसाचा अपमान करत त्याच्या कानाखाली वाजवत त्याला धक्काबुक्की केली आहे. यानंतर हा पोलीस त्याठिकाणाहून निघून गेला.

ट्विटरवर संतापजनक प्रक्रिया
हा व्हिडिओ व्हायरल होताच, टि्वटरवर वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटल्या आहेत. या महिलेवर कठोर कारवाई करावी, असे मत युजर्सनी व्यक्त केले आहे. या महिलेकडे असं वागण्याचा अधिकार होता का? असा प्रश्नदेखील काही लोकांनी उपस्थित केला आहे.

Share This News

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!