Ankit Bawne

Ankit Bawne : क्रिकेटर अंकित बावणेचा ‘पुनीत बालन ग्रुप’शी सहकार्य करार

820 0

पुणे : महाराष्ट्राचा धडाकेबाज फलंदाज अंकित बावणे (Ankit Bawne) आता ‘पुनीत बालन ग्रुप’शी जोडला गेला आहे. या दोघांमध्ये नुकताच सहकार्य करार झाला असून त्याअंतर्गत आता बावणे (Ankit Bawne) याच्या क्रिकेट खेळासाठीची सर्वोतोपरी मदत ‘पुनीत बालन ग्रुप’च्या माध्यमातून केली जाणार आहे. यामुळे रणजी स्पर्धेत चमकदार कामगिरी करणाऱ्या बावणे याला देशाच्या संघातही झळकण्यास मदत होणार आहे.

‘पुनीत बालन ग्रुप’ने आतापर्यंत विविध खेळाडूंना खेळासाठी मदत केली आहे. यामध्ये आता अंकित बावणे याचाही समावेश झाला आहे. वयाच्या १५ व्या वर्षी किकेटमध्ये पदार्पण करणार्‍या अंक़ित बावणे याने चमकदार कामगिरी करत आपले कौशल्य दाखविले आहे. अंडर १८ मध्येही त्याने उत्तम खेळी केली होती. नुकत्याच झालेल्या पहिल्या ‘महाराष्ट्र प्रिमिअर लीग’मध्ये पुनीत बालन यांच्या ‘कोल्हापुर टस्कर्स’ टिमकडून बावणे याने चांगली कामगिरी केली. या स्पर्धेतील टी-20 मधील पहिले शतक ठोकण्याचा बहुमानही त्याने मिळविला. क्रिकेटमधील बावणे याची कामगिरी लक्षात घेऊन ‘पुनीत बालन ग्रुप’ने त्याच्याबरोबर सहकार्य करार केला आहे. या अंतर्गत बावणे याला क्रिकेटसाठी लागणारी सर्वोतोपरी मदत या ग्रुपकडून दिली जाणार आहे. या माध्यमातून बालन यांनी आणखी एका प्रतिभावान खेळाडूला जोडले आहे. या करारानंतर अंकित बावणे आणि पुनीत बालन यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.

काय म्हणाले अंकित बावणे ?
‘पुनीत बालन ग्रुप’ने आतापर्यंत अनेक खेळाडूंना सहकार्य करून त्यांची कारकीर्द उंचावण्यास मोलाची मदत केली आहे. पुरेशा साधनां अभावी अनेक गुणी खेळाडूंचे करियर संपुष्टात आलेली ही अनेक उदाहरणे आहेत. या पार्श्वभूमीवर ‘पुनीत बालन ग्रुप’चं योगदान हे अनन्यसाधारण आहे.अशा ग्रुपशी मी जोडला गेलो याचा मनापासून आनंद आहे. यामुळे माझ्या करिअरला नक्कीच मदत होईल, यात शंका नाही.

काय म्हणाले पुनीत बालन ?
“अंकित बावणे (Ankit Bawne) हा गुणवंत खेळांडु आहे. एमपीएल स्पर्धेत त्याने आपली कामगिरी दाखवून दिली आहे. ‘पुनीत बालन ग्रुप’च्या माध्यमातून तो आमच्याशी जोडला गेला याचा निश्चितपणे आनंद आहे. आंतरराष्ट्रीय पातळीवर अशीच जोरदार कामगिरी करून तो भारताचे नाव उज्वल करेल, अशी खात्री आहे.

Share This News
error: Content is protected !!