Team India

Cricket World Cup : भारतीय क्रिकेट संघ 2024 मध्ये 3 वर्ल्डकप खेळणार

876 0

मुंबई : यंदा 2023 साली भारतात खेळल्या गेलेल्या ICC एकदिवसीय वर्ल्डकप फायनलमध्ये टीम इंडियाच्या पराभवातून भारतीय चाहते अजूनही सावरले नाहीत. भारत घरच्या मैदानावर विजेतेपद मिळवण्याचा सर्वात मोठा दावेदार होता. भारतीय संघाने संपूर्ण स्पर्धेत एकतर्फी विजय मिळवून अंतिम फेरी गाठली पण त्यांना अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियाविरुद्ध पराभव पत्करावा लागला. मात्र आता येणाऱ्या नवीन वर्षात एक नाही तर तीन वर्ल्डकप ट्रॉफी जिंकायची संधी आहे. त्यामुळे भारतीय क्रिकेट संघाचा आयसीसी ट्रॉफी जिंकण्याचा दुष्काळ नव्या वर्षात संपुष्टात येऊ शकतो.

नवीन वर्षात तीन वर्ल्डकप
2024 मध्ये भारताला तीन वर्ल्डकप ट्रॉफी जिंकण्याची संधी असेल. हे सर्व भारताच्या विविध क्रिकेट संघांसाठी आहेत. आयसीसीचे पहिले विजेतेपद भारताच्या ज्युनियर संघावर म्हणजेच अंडर-19 विश्वचषक स्पर्धेत सहभागी होणार्‍या युवकांवर अवलंबून असणार आहे. 19 जानेवारी ते 11 फेब्रुवारी 2024 या कालावधीत दक्षिण आफ्रिकेत ही अंडर-19 विश्वचषक स्पर्धा खेळवली जाणार आहे.

वर्षातील दुसरा वर्ल्डकप ज्यामध्ये भारताचा वरिष्ठ संघ सहभागी होणार आहे तो यजमान अमेरिका आणि वेस्ट इंडिजमध्ये टी – 20 वर्ल्डकप खेळणार आहे. 4 जून ते 30 जून दरम्यान हा वर्ल्डकप खेळवला जाणार आहे. रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली टीम इंडिया या T20 वर्ल्डकप खेळू शकतो.

तिसऱ्या वर्ल्डकपबद्दल बोलायचे झाल्यास महिला संघ सप्टेंबरमध्ये आयसीसी ट्रॉफी जिंकण्याच्या इराद्याने टी-20 फॉरमॅटमध्ये प्रवेश करेल. ही स्पर्धा बांगलादेशमध्ये खेळवण्यात येणार आहे.

नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.

Nitin Kareer : नितीन करीर राज्याचे नवे मुख्य सचिव

Women Fight Video : दिल्ली मेट्रोमध्ये रंगली ‘दंगल’ तुफान हाणामारीचा VIDEO व्हायरल

Immunity Boost : आजारांपासून राहायचं असेल दूर, इम्युनिटी बूस्ट करण्यासाठी खा ‘या’ 7 गोष्टी

Accident News : अहमदनगरमध्ये ट्रक आणि कारमध्ये भीषण अपघात; 3 जण ठार

Jayant Patil : ‘जयंत पाटील इकडे येणार होते म्हणून मंत्रिमंडळाचा विस्तार रखडला’; शिवसेनेच्या ‘या’ आमदाराने केले मोठे वक्तव्य

Chhatrapati Sambhajinagar Accident : छत्रपती संभाजीनगर हळहळलं ! बाईकच्या अपघातातून वाचले अन्…

Sport News : 2023 मध्ये क्रीडा विश्वात घडल्या ‘या’ महत्वाच्या घडामोडी

Movie Released In 2023 : ‘या’ 15 चित्रपटांनी 2023 मध्ये बॉक्स ऑफिसवर अनेक रेकॉर्ड मोडत केला कल्ला

Veteran Artists Pass Away In 2023 : 2023 मध्ये ‘या’ दिग्ग्ज कलाकारांनी घेतला जगाचा निरोप

Chhatrapati Sambhajinagar : छत्रपती संभाजीनगरमध्ये हँडग्लोज बनवणाऱ्या कंपनीला भीषण आग; 6 जणांचा होरपळून मृत्यू

Top Political Events 2023 : 2023 मध्ये घडल्या ‘या’ महत्वाच्या राजकीय घडामोडी

Share This News
error: Content is protected !!
WhatsApp

WhatsApp

1
Join Us On WhatsApp 😊.
Hide