छत्रपती संभाजीनगर : शिवसेनेचे नेते आमदार संजय शिरसाट यांनी राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते जयंत पाटील (Jayant Patil) यांच्याबाबत मोठं वक्तव्य केलं आहे. जयंत पाटील इकडे येणार होते, म्हणूनच मंत्रिमंडळचा विस्तार रखडला आहे. छत्रपती संभाजीनगरमध्ये आयोजित पत्रकार परिषदेत त्यांनी हे वक्तव्य केले आहे. संजय शिरसाट यांच्या या वक्तव्यामुळे पुन्हा एकदा चर्चेला उधाण आलं आहे.
नेमकं काय म्हणाले संजय शिरसाट?
संजय शिरसाट यांनी पत्रकार परिषदेमध्ये बोलताना मोठं वक्तव्य केलं आहे. ‘मी तुम्हाला सांगतो, ही एक बातमीच आहे. जयंत पाटील हे इकडे येणार होते, म्हणून मंत्रिमंडळाचा विस्तार रखडला होता. आणि आता ते निष्ठेच्या गप्पा मारत आहेत. त्यांनी आता तरी थांबावं, अन्यथा सर्व बाहेर आलं तर त्यांना कळेल आपण कुठे होतो आणि आपलं काय झालं’ असं संजय सिरसाट यांनी म्हटलं आहे.
दरम्यान पुढे बोलताना त्यांनी म्हटलं की, ‘जयंत पाटलांनीच हा प्रस्ताव दिला होता की आपल्याला भाजपसोबत जायचं आहे. त्यासाठी झालेल्या बैठकीमध्ये ही सर्व चर्चा झाली होती. आपण सर्व मिळून हे शरद पवार साहेबांना सांगू असं त्या बैठकीमध्ये ठरलं होतं. आजही जयंत पाटील हे फक्त शरिरानं तिकडे आहे, मात्र मनानं अजित पवारांसोबत आहेत,’ हे माझं मत असल्याचं शिरसाट यांनी म्हटलं आहे.
नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.
Chhatrapati Sambhajinagar Accident : छत्रपती संभाजीनगर हळहळलं ! बाईकच्या अपघातातून वाचले अन्…
Sport News : 2023 मध्ये क्रीडा विश्वात घडल्या ‘या’ महत्वाच्या घडामोडी
Movie Released In 2023 : ‘या’ 15 चित्रपटांनी 2023 मध्ये बॉक्स ऑफिसवर अनेक रेकॉर्ड मोडत केला कल्ला
Veteran Artists Pass Away In 2023 : 2023 मध्ये ‘या’ दिग्ग्ज कलाकारांनी घेतला जगाचा निरोप
Top Political Events 2023 : 2023 मध्ये घडल्या ‘या’ महत्वाच्या राजकीय घडामोडी