Cricket

Viral Video: अंपायरने भर मैदानात ‘चंद्रा’ गाण्यावर केला जबरदस्त डान्स

896 0

मुंबई : क्रिकेटच्या (Cricket) मैदानात आपल्या अफलातून स्टाईलमुळे प्रसिद्ध असलेले पंच बिली बाउडन (Umpire Billy Bowden) आपल्याला माहीतच असेल. ते आपल्या हटके स्टाईलने मैदानात आपला निर्णय देत होते. त्यांची ती स्टाईल पाहून प्रेक्षकांना हमखास हसू फुटत होते. त्यांच्या स्टाईलनं प्रेक्षकांचं मनोरंजन होतं, म्हणूनच बिली सगळ्यांचे आवडते पंच आहेत. मात्र सध्या बिली बाउडनसारख्या एका पंचाचा व्हिडिओ सोशल मीडियावर (Social Media) जोरदार व्हायरल होत आहे.

अंपायरचा चंद्रा गाण्यावर डान्स
सध्या सोशल मीडियावर एक व्हिडिओ जोरदार व्हायरल होत आहे. यामध्ये एक अंपायर चक्क एका सामन्याच्या दरम्यान मंत्रमुग्ध होऊन डान्स करताना दिसून येत आहे. ते चंद्रा या मराठी गाण्यावर डान्स करताना दिसत आहेत. त्यांच्या या हटके शैलीमुळे ते सोशल मीडियावर चांगलेच चर्चेत आहेत. एवढेच नाहीतर या भन्नाट पंचाचा मैदानातला डान्स पाहून नेटकरीसुद्धा त्याच्यावर फिदा झाले आहेत. सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर धुमाकूळ घालताना दिसत आहे.

Share This News
error: Content is protected !!