Rohit Sharma

Rohit Sharma : रोहित शर्माने तोडला ख्रिस गेलचा ‘हा’ मोठा विक्रम

797 0

विश्वचषक 2023 च्या अंतिम सामन्याला (IND vs AUS Final) काही वेळात सुरुवात होणार आहे. भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात हा सामना खेळवण्यात येणार आहे. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर हा महामुकाबला पार पडणार आहे. रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाने या स्पर्धेत आतापर्यंत अप्रतिम कामगिरी केली आहे.

या सामन्यात टीम इंडियाची कामगीरी थोडीशी निराशाजनक झाली आहे. टीम इंडियाला 200 वर आपल्या 5 विकेट गमवाव्या लागल्या आहेत. या सामन्यात रोहित शर्माला जरी अर्धशतक पूर्ण करता आले नसले तरी त्याने ख्रिस गेलचा एक मोठा विक्रम आपल्या नावावर केला आहे. रोहित शर्माने 31 चेंडूत 47 धावा केल्या. या छोटेखानी खेळीत रोहित शर्माने तीन षटकार आणि 4 चौकार ठोकले.वनडे क्रिकेटमध्ये कोणत्याही एका संघाविरुद्ध सर्वाधिक षटकार मारण्याचा विक्रम रोहित शर्माच्या नावावर झाला आहे.

रोहितने ऑस्ट्रेलियाविरुद्ध 87 षटकार ठोकले आहेत. रोहितपूर्वी वनडेत एका संघाविरुद्ध सर्वाधिक षटकार मारण्याचा विक्रम ख्रिस गेल याच्या नावावर होता. त्याने इंग्लंड संघाविरुद्ध वनडेत 85 षटकार मारले होते. आता हा विक्रम रोहित शर्माच्या नावावर झाला आहे.

नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.

Share This News

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!