Cricket

Cricket : ऑलिम्पिकमध्ये रंगणार क्रिकेटचे सामने; IOC कडून करण्यात आले शिक्कामोर्तब

648 0

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – 2028 साली अमेरिकेतील लॉस एंजेलिस येथे खेळण्यात येणाऱ्या ऑलिम्पिकमध्ये क्रिकेटचाही (Cricket) समावेश होणार आहे. मुंबईमध्ये सध्या सुरु असलेल्या आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीच्या बैठकीमध्ये हा निर्णय घेण्यात आला आहे. मुंबईतील जिओ वर्ल्ड कनव्हेंशन सेंटरमध्ये सध्या आयओसीची बैठक पार पडली. याच बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे.

“लॉस एंजेलिस समितीने 5 खेळांचा या स्पर्धेत समावेश करता येईल असं म्हटलं आहे. यामध्ये क्रिकेटचाही समावेश आहे. कार्यकारी समिती यावर उद्या होणाऱ्या बैठकीमध्ये चर्चा करेल,” असं अंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीचे स्पोर्ट्स डायरेक्टर असलेल्या किर्ती मॅककॉनेल यांनी प्रसारमाध्यमांना दिलेल्या माहितीत म्हंटले आहे. लॉस एंजेलिस 2028 ऑलिम्पिकचं आयोजन करणाऱ्या समितीने सोमवारी क्रिकेटचाही ऑलिम्पिकमध्ये समावेश करण्याचा प्रस्ताव मांडला. यासंदर्भातील मागणी मागील 128 वर्षांपासून केली जात होती.

आंतरराष्ट्रीय क्रिकेट समितीने यासंदर्भातील अधिकृत पत्रक 9 ऑक्टोबर रोजी जारी केलं. ऑलिम्पिक समितीच्या बैठकीमध्ये क्रिकेटचा समावेश करण्याचा प्रस्ताव मांडला जाईल असं सांगण्यात आलं होतं. “2 वर्ष आयसीसी लॉस एंजेलिस ऑलिम्पिक समितीबरोबर चर्चा करत होती. ऑलिम्पिकमध्ये क्रिकेटचा समावेश करण्यासंदर्भातील संपूर्ण तयारीनंतर हा प्रस्ताव मांडण्यात आला आहे.

Share This News
error: Content is protected !!