New Zealand Team

World Cup 2023 : विश्वचषकासाठी न्यूझीलंडने संघाची अनोख्या पद्धतीने केली घोषणा; सर्वत्र होतंय कौतुक

674 0

ऑक्टोबर महिन्यात आयसीसी एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेला (World Cup 2023) सुरुवात होणार आहे. 5 ऑक्टोबर ते 19 नोव्हेंबरदरम्यान भारतात ही स्पर्धा खेळवली जाणार आहे. या स्पर्धेसाठी जवळपास सर्व देशांनी आपले संघ जाहीर केले आहेत. न्यूझीलंड क्रिकेट बोर्डाने विश्वचषकासाठी 15 खेळाडूंच्या संघाची घोषणा केली. केन विल्यमसन या संघाचे नेतृत्व करणार आहे.

अनोख्या पद्धतीने संघाची घोषणा
विश्वचषक स्पर्धेसाठी न्यूझीलंड बोर्डाने संघाची घोषणा केली. पण ही घोषणा अगदी हटके पद्धतीने करण्यात आली आहे. न्यूझीलंड क्रिकेट बोर्डाने हा व्हिडिओ आपल्या अधिकृत एक्स अकाऊंटवर शेअर केला असून या व्हिडिओचं कौतुक केलं जात आहे.

काय आहे व्हिडिओमध्ये?
साधारणपणे संघाची घोषणा करताताना पत्रकार परिषद घेतली जाते. या पत्रकार परिषदेत संघाचा कर्णधार आणि चीफ सिलेक्टर संघाची घोषणा करतात. पण न्यूझीलंड संघाने चक्क खेळाडूंच्या कुटुंबाचाच नाव घोषित करण्यासाठी वापर केला आहे. न्यूझीलंड क्रिकेट बोर्डाने एक व्हिडिओ बनवला असून या व्हिडिओत खेळाडूंच्या पत्नी आणि मुलं आपल्या नवऱ्याचं किंवा वडिलांची जर्सी नंबर आणि नाव सांगताना दिसत आहेत. सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे.

विश्वचषकासाठी न्यूझीलंड संघ
केन विलियमसन (कर्णधार), ट्रेंट बोल्ट, मार्क चॅपमैन, डेवोन कॉनवे, लॉकी फर्गुसन, मॅट हेनरी, टॉम लाथम, डेरेल मिचेल, जिमी नीशम, ग्लेन फिलिप्स, रचिन रविंद्र, मिचेल सैंटनर, इश सोढी, टिम साउदी, विल यंग

Share This News

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!