भारतीय संघापाठोपाठ दक्षिण आफ्रिकेनेही (South Africa News) वर्ल्ड कप स्पर्धेसाठी 15 सदस्यीय संघाची घोषणा केली. टेम्बा बवुमाच्या नेतृत्वाखाली हा संघ खेळणार आहे. या संघात 2 आंतरराष्ट्रीय वन डे सामन्यांचा अनुभव असलेल्या जलदगती गोलंदाज गेराल्ड कोएत्झी याला संधी देण्यात आली आहे. या संघात क्विंटन डी कॉक, रिझा हेंड्रीक्स, हेनरिच क्लासेन, एडन मार्कराम, डेव्हिड मिलर व रॅसी व्हॅन डेर ड्युसेन हे अनुभवी खेळाडूही संघात आहेत.
यादरम्यान आता दक्षिण आफ्रिकेसाठी एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. वर्ल्ड कप स्पर्धेनंतर वन डे क्रिकेटमधून निवृत्ती घेणार असल्याचे दक्षिण आफ्रिकेचा ओपनर क्विंटन डी कॉकने जाहीर केले आहे.क्विंटन 2013 पासून आफ्रिकेच्या वन डे संघाचा सदस्य आहे आणि त्याने 140 वन डे सामन्यांत 44.85 च्या सरासरीने 17 शतकं व 29 अर्धशतकांसह 5966 धावा केल्या आहेत. 2020-2021 या कालावधीत त्याने संघाचे नेतृत्वदेखील केले होते.
वर्ल्डकपसाठी दक्षिण आफ्रिकेचा संघ
तेम्बा बवुमा (कर्णधार), गेराल्ड कोएत्झी, क्विंटन डी कॉक, रिझा हेंड्रीक्स, मार्के येनसन, हेनरिच क्लासेन, सिसांदा मगाला, केशव महाराज, एडन मार्कराम, डेव्हिड मिलर, लुंगी एनगिडी, एनरिच नॉर्खिया, कागिसो रबाडा, तब्रेझ शम्सी, रॅसी व्हॅन डेर ड्युसेन