Ben Stokes

बेन स्टोक्सने टेस्टमध्ये रचला इतिहास; अशी कामगिरी करणारा ठरला पहिलाच कॅप्टन

678 0

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – इंग्लंड (England) आणि आयर्लंड (Ireland) या दोन संघातील एकमेव कसोटी सामना शनिवारी पार पडला. हा सामना लंडनमधील लॉर्ड्स (Lords) या ठिकाणी खेळवण्यात आला होता. या सामन्यात इंग्लंडने आयर्लंडवर 10 विकेट्स राखून विजय मिळवला. या विजयासह इंग्लंडचा टेस्ट कर्णधार बेन स्टोक्सने (Ben Stokes) एक मोठा विक्रम आपल्यानंतर नावावर केला आहे.

काय आहे तो विक्रम?
आयर्लंडचा पहिला डाव 56.2 षटकांत 172 धावांत आटोपला. त्यानंतर इंग्लंडने आपला पहिला डाव 4 गड्यांच्या मोबदल्यात 524 धावा करून डाव घोषित केला. यानंतर दुसऱ्या डावात आयर्लंडने 9 विकेट गमावत 362 धावा केल्या आणि इंग्लंडला 11 धावांचे लक्ष्य दिले. यानंतर इंग्लंडने केवळ 4 चेंडूत हे विजयी लक्ष्य गाठले. यानंतर इंग्लंडचा कर्णधार बेन स्टोक्सने एक मोठा विक्रम आपल्या नावावर केला. टेस्ट क्रिकेटच्या (Test Cricket) 145 वर्षांच्या इतिहासात कोणीही अशी कामगिरी केली नव्हती. बेन स्टोक्स हा टेस्ट क्रिकेटमध्ये फलंदाजी, गोलंदाजी किंवा किपिंगशिवाय सामना जिंकणारा पहिला कर्णधार ठरला आहे.

Share This News
error: Content is protected !!
WhatsApp

WhatsApp

1
Join Us On WhatsApp 😊.
Hide