Ben Stokes

Ben Stokes : बेन स्टोक्सने ‘या’ कारणामुळे निवृत्ती घेतली मागे

821 0

नवी दिल्ली : भारतात होणाऱ्या विश्वचषकासाठी इंग्लंडचा संघ सज्ज झाला आहे. इग्लंड व्यवस्थापकांच्या विनंतीनंतर अष्टपैलू बेन स्टोक्स (Ben Stokes) याने वनडे क्रिकेटमधील निवृत्तीचा (Ben Stokes) निर्णय मागे घेतला आहे. आयसीसीने याबाबत माहिती दिली आहे. विश्वचषकाआधी इंग्लंडचा संघ न्यूझीलंडविरोधात वनडे मालिका खेळणार आहे. बेन स्टोक्स न्यूझीलंडविरोधात होणाऱ्या मालिकेपासून वनडे मध्ये पुनरागमन करणार आहे.

इंग्लंड आणि न्यूझीलंड यांच्यातील वनडे मालिकेला 8 सप्टेंबर पासून सुरुवात होणार आहे. या वनडे मालिकेसाठी बेन स्टोक्सची संघात निवड करण्यात आली आहे. वर्कलोडमुळे स्टोक्सने मागच्या वर्षी वनडे क्रिकेटमधून निवृत्ती घेतली होती. पण आता आगामी वनडे विश्वचषकाच्या पार्श्वभूमीवर त्याने निवृत्तीचा निर्णय मागे घेतला आहे.

बेन स्टोक्सची वनडेमधील कामगिरी
अष्टपैलू बेन स्टोक्स याने इंग्लंडसाठी 105 वनडे सामने खेळले आहेत. यामध्ये त्याने 90 डावात 2924 धावा केल्या आहेत. 102 ही त्याची सर्वोच्च धावसंख्या आहे. यामध्ये त्याने 3 शतके आणि 21 अर्धशतके झळकावली आहेत. त्याने आपल्या गोलंदाजीच्या जोरावर 88 डावात 74 विकेट घेतल्या आहेत. 61 धावांच्या मोबदल्यात 5 विकेट, ही वनडेमधील सर्वोत्तम कामगिरी राहिली आहे.

Share This News
error: Content is protected !!