सिडनी : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात 7 जून रोजी WTC ची फायनल मॅच होणार आहे. ओव्हल मैदानावर (Oval Ground) हा सामना खेळवण्यात येणार आहे. टीम इंडियाने सलग दुसऱ्यांदा WTCच्या फायनलमध्ये प्रवेश केला आहे.तर टीम ऑस्ट्रेलिया पहिल्यांदाच फायनलमध्ये पोहोचली आहे. इंग्लंडमध्ये 7 ते 11 जून दरम्यान वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपची फायनल होणार आहे. क्रिकेट ऑस्ट्रेलियाने सुद्धा WTC फायनलसाठी आपला संघ जाहीर केला आहे.
या टीममध्ये एका खेळाडूची आश्चर्यकारक निवड करण्यात आली आहे. फिटनेसची समस्या असूनही जोश हेझलवूडची ऑस्ट्रेलियन टीममध्ये निवड झाली आहे. पुढच्या आठवड्यात होणाऱ्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप 2023 च्या फायनलसाठी ऑस्ट्रेलियाने आपल्या 15 सदस्यीय संघ जाहीर केला आहे. लंडनमधील द ओव्हल येथे ही फायनल पार पडणार आहे. 32 वर्षीय जोश हेझलवूड ऑल राऊंडर मिचेल मार्श आणि बॅट्समन मॅथ्यू रेनशॉ यांची जागा घेणार आहे.
WTC फायनलसाठी ऑस्ट्रेलियाचा संघ
पॅट कमिन्स (कॅप्टन), स्कॉट बोलँड, एलेक्स कॅरी, कॅमरुन ग्रीन, मार्कस हॅरिस, जोश हेझलवूड, ट्रेव्हिस हेड, जोश इग्लिस, उस्मान ख्वाजा, मार्नस लाबुशेन, नाथन लेयॉन, टॉड मर्फी, स्टीव्ह स्मिथ, मिचेल स्टार्क, डेविड वॉर्नर
WTC फायनल साठी भारतीय संघ :
रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली, अजिंक्य रहाणे, श्रीकर भरत (यष्टिरक्षक), आर. अश्विन, रवींद्र जाडेजा, अक्षर पटेल, शार्दूल ठाकूर, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, उमेश यादव, जयदेव उनाडकट, ईशान किशन.
राखीव : यशस्वी जयस्वाल, मुकेशकुमार, सूर्यकुमार यादव.