Asian Games 2023

Asian Games 2023 : ठाण्याच्या रुद्रांश पाटीलने केला वर्ल्ड रेकॉर्ड; एअर रायफलमध्ये जिंकलं गोल्ड मेडल

721 0

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – आशियाई क्रीडा स्पर्धेचा (Asian Games 2023) आज दुसरा दिवस आहे. आज सकाळच्या सुमारास भारतासाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे. या स्पर्धेत भारताने पहिले सुवर्ण पदक जिंकले आहे. ठाण्याच्या मराठमोळ्या रुद्रांक्ष पाटीलने आशियाई क्रीडा स्पर्धेत चमकदार कामगिरी करत 10 मीटर एअर रायफल स्पर्धेत क्वालिफायरमध्ये दिव्यांश पनवार, रुद्राक्ष पाटील आणि ऐश्वर्या प्रताप सिंग यांनी देशासाठी पहिले सुवर्णपदक जिंकले. या जोडीने कोरिया आणि चीनला हरवून हे पदक जिंकले आहे. भारतीय टीमने 1893.7 गुणांसह मोठा विश्वविक्रमदेखील केला आहे.

नेमबाजीतील पहिले सुवर्ण
चीनमधील हांगझोऊ येथे सुरू असलेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेत भारताला पहिले सुवर्णपदक मिळाले आहे. सोमवारी पुरुषांच्या 10 मीटर एअर रायफल सांघिक प्रकारात भारताने हे सुवर्णपदक जिंकले. रुद्राक्ष पाटील, ऐश्वर्या प्रतापसिंग तोमर आणि दिव्यांश या त्रिकूटाने भारताला सुवर्णपदक मिळवून दिलं आहे. तसेच दुसरीकडे रोइंगमध्ये भारताला कांस्यपदक मिळाले आहे. जसविंदर, आशिष, पुनीत आणि आशिष यांनी पुरुषांच्या 4 रोइंग स्पर्धेत कांस्यपदक जिंकले. मात्र बलराज पनवारचे थोडक्यात रोईंगमधील पदक हुकले.

Share This News
error: Content is protected !!