KL Rahul

PAK Vs IND : पाकिस्तान विरुद्धच्या सामन्यामध्ये केएल राहुलची एन्ट्री होताच ‘या’ खेळाडूला मिळणार डच्चू

1033 0

कोलंबो : आशिया कप 2023 मध्ये टीम इंडिया सुपर 4 मधील पहिला सामना (PAK Vs IND) हा 10 सप्टेंबरला खेळणार आहे. टीम इंडियात या सामन्यात कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तान विरुद्ध भिडणार आहे. हा सामना श्रीलंकेतील कोलंबोमधील आर प्रेमदासा स्टेडियममध्ये खेळवण्यात येणार आहे. हा सामना भारतीय वेळेनुसार दुपारी 3 वाजता सुरुवात होणार आहे. या सामन्यासाठी टीम इंडियाच्या प्लेइंग 11 मध्ये बदल करण्यात येणार आहे.

विकेटकीपर बॅट्समन केएल राहुल याचं कमबॅक झालं आहे. केएल याची आशिया कपसाठी निवड करण्यात आली. मात्र त्याला दुखापतीमुळे पाकिस्तान आणि नेपाळ विरुद्धच्या सामन्यात खेळता आलं नाही. मात्र आता तो पूर्णपणे फीट झाला आहे. त्यामुळे केएल राहुलचे पाकिस्तान विरुद्धच्या सामन्यात खेळणार असल्याचे समजत आहे. जर केएल राहुलचे आगमन झाले तर पाकिस्तान विरुद्ध प्लेईंग ईलेव्हनमधून ईशान किशन याचा पत्ता कट होणार आहे. राहुलने नेट्समध्ये जोरदार तयारी केली आहे.

आशिया कपसाठी टीम इंडिया
रोहित शर्मा (कॅप्टन), शुबमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, सूर्यकुमार यादव, तिलक वर्मा, केएल राहुल, ईशान किशन, हार्दिक पंड्या, रविंद्र जडेजा, शार्दुल ठाकूर, अक्षर पटेल, कुलदीप यादव जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, प्रसिद्ध कृष्णा आणि संजू सॅमसन (राखीव विकेटकीपर)

Share This News
error: Content is protected !!