Delhi Capitals

दिल्लीच्या संघाला मोठा धक्का! ‘हा’ मॅचविनर खेळाडू अचानक मायदेशी परतला

678 0

मुंबई : सध्या आयपीएल एका रंगतदार वळणावर आली आहे. टॉप 4 मध्ये कोणते संघ जागा मिळवतात हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. या सिझनमध्ये अनेक खेळाडू दुखापतीमुळे बाहेर गेले आहेत. त्यातच आता दिल्ली कॅपिटल्स संघासाठी धक्का देणारी एक मोठी बातमी समोर आली आहे. दिल्लीच्या संघाचा मॅचविनर खेळाडू अचानक तडकाफडकी मायदेशी परतला आहे. त्याने हा निर्णय अचानक का घेतला याची चर्चा सुरु असताना दिल्लीच्या संघाने ट्विट करून याची माहिती दिली आहे.

या खेळाडूचे नाव आहे एनरिक नॉर्खिया. तो दिल्लीकडून सर्वात यशस्वी गोलंदाज ठरला आहे. एनरिक नॉर्खिया आपल्या काही वैयक्तीक कारणांमुळे IPL सामने अर्धवट सोडून मायदेशी परतला आहे. यामुळे दिल्लीचा कर्णधार डेव्हिड वॉर्नरचे टेन्शन वाढले आहे. तसेच परतणार कि नाही हे समजू शकलेले नाही. तसेच तो नेमका कोणत्या कारणामुळे मायदेशी परतला हे पण समजू शकलेले नाही.

एनरिक नॉर्खिया आतापर्यंत खेळलेल्या 8 सामन्यात 7 विकेट्स घेतल्या आहेत. त्याच्या एकूण आयपीएल कारकिर्दीबद्दल बोलायचे झाल्यास त्याने आतापर्यंत 38 सामने खेळले आहेत. यामध्ये त्याने 50 विकेट घेतल्या आहेत. 33 धावांत 3 विकेट्स हा त्याचा आतापर्यंतचा सर्वोत्तम स्पेल आहे. दिल्लीच्या संघाची यंदाची कामगिरी बघता दिल्लीच्या संघाने 9 पैकी 3 सामने जिंकले आहेत.

Share This News
error: Content is protected !!