Maharashtra Kesari 2023

Maharashtra Kesari 2023 : 66 व्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेची घोषणा; ‘या’ ठिकाणी रंगणार कुस्त्यांचे सामने

1025 0

पुणे : राज्यभरातील कुस्तीपटू आणि कुस्ती शौकिनांसाठी (Maharashtra Kesari 2023) एक महत्वाची आणि मोठी बातमी समोर आली आहे. महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघातर्फे घेण्यात येणाऱ्या 66 वी महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेबाबत महत्वाची माहिती समोर आली आहे. पुणे जिल्ह्यातील वाघोली लोणीकंद जवळ फुलगाव या ठिकाणी ही स्पर्धा खेळवण्यात येणार आहे. 1 ते 7 नोव्हेंबर दरम्यान नेताजी सुभाषचंद्र बोस शाळेच्या मैदानावर या स्पर्धा होणार आहेत.

महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघाचे अध्यक्ष खासदार रामदास तडस यांनी याबाबतची अधिकृत घोषणा केली आहे. या स्पर्धेसाठी देशाचे गृहमंत्री अमित शाह तसेच राज्याचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री उपस्थित राहणार आहेत. तसेच राष्ट्रीय कुस्तीगीर परिषदेचे अध्यक्ष बृजभूषण सिंह हे सुद्धा उपस्थित राहण्याची शक्यता आहे.

Share This News
error: Content is protected !!