गव्हाची (भरड) खीर पाककृती : नागपंचमीच्या दिवशी असा बनवा नैवेद्य ; पौष्टिक आणि चविष्ट

187 0

पाककृती : हिंदू धर्मशास्त्रानुसार वर्षभरात येणाऱ्या सणांना वेगवेगळ्या प्रकारचे नैवेद्य अर्पण करण्याची पद्धत आहे. यामध्ये आज नागपंचमीच्या निमित्ताने दूध लाह्या आणि गव्हाच्या खिरीचा नैवेद्य अर्पण करण्याची पद्धत आहे. चला तर मग पाहूयात गव्हाची खीर बनवण्यासाठी लागणारे साहित्य …
एक पाणी असलेला नारळ , गुळ , गव्हाची भरड , वेलची, जायफळ ,दूध , पाणी

कृती : १. सर्वप्रथम गव्हाची खीर बनवण्यासाठी गव्हाची भरड स्वच्छ धुऊन घ्या. इतर तयारी होईपर्यंत बोटाचे एक पेर बुडेल एवढे पाणी घालून भरड भिजत ठेवा.
२. नारळ वाढवून त्यातील पाणी गाळून घ्या. नारळ मिक्सरमधून बारीक करून घ्या ,किंवा खवून घ्या.
३. एका कुकरमध्ये तीन चमचे तूप घ्या . तूप तापल्यानंतर यामध्ये नारळाचा ओला चव घाला . हलके तुपावर भाजून घेतल्यानंतर गुलाबी रंग येताच, गव्हाची भरड घालून परता . यामध्ये गुळ पावडर किंवा किसलेला वाटीभर गूळ घाला.
४. यामध्ये दोन वेलची कुटून घालाव्यात वेलची पूड देखील चालेल . त्यानंतर या संपूर्ण मिश्रणामध्ये नारळातील पाणी आणि दीड ग्लास पाणी घालून शिजू द्या . चांगले शिजल्यानंतर यामध्ये एक मोठी वाटी दूध किंवा अंदाजानुसार घालून सर्व मिश्रण व्यवस्थित हलवून घ्या. कुकरचे झाकण लावून त्यास पाच शिट्या येऊ द्या .
५. कुकर थंड झाल्यानंतर हे मिश्रण मध्ये जायफळ किसून घालावे आणि सर्विंग बाऊलमध्ये त्यास घ्यावे .
आवडीनुसार या खिरीमध्ये काजू ,बदाम, पिस्ते, मनुके ,बेदाणे तुपावर हलके भाजून घालू शकता . ही खीर चवीला खूप छान लागतेच ,त्यासह अत्यंत पौष्टिक देखील असते.

Share This News
error: Content is protected !!