Breaking News

पुणे तिथे काय उणे : पुण्यातील हि नवी पाटी पाहिलीत का ? “सावधान नवले ब्रीज पुढे आहे”…!

289 0

पुणे : पुण्यातील नवले पुलावर आजपर्यंत अनेक लहान – मोठे अपघात झाले आहेत. अनेकांनी यात आपले जीव देखील गमावले आहेत. नुकताच या पुलावर एका कंटेनरने सुमारे ४८ गाड्यांचे मोठे नुकसान केले. या अपघातामध्ये ७ ते ८ नागरिकही जखमी झाले. सुदैवाने जीवितहानी झाली नसली तरी हा अपघात फार मोठा होता. तेथवर थांबत नाही तो दुसऱ्याच दिवशी दुचाकीस्वारांच्या अपघातामध्ये चालकाचे जागीच प्राण गेले.

सुरवातीपासूनच अपघातांचा पूल म्हणवल्या जाणाऱ्या या पुलाचे या अपघाताच्या निमित्ताने नावावर शिक्कामोर्तबच झाले. अर्थात पुणेकर काही मागे राहणार नव्हते. सध्या एक पुणेरी पतीची लक्ष वेधून घेते आहे. बॅनरवर लागलेले चित्र आणि मजकूर चर्चेचा विषय बनत आहे. प्रवाशांमध्ये जनजागृती होण्यासाठी हे बॅनर लावण्यात आले आहेत. नवले ब्रिजवर सेल्फी पॉइंट इथ लावण्यात आले आहेत. त्यामुळे पुणेकरांनी या कुप्रसिद्ध पुलावर जाण्यापूर्वी थांबून सेल्फी घेण्याची प्रथा सुरु झाली तर वावगं वाटायला नको.

Share This News
error: Content is protected !!