ई-पासपोर्ट म्हणजे काय आहे, तो कसा वापरता येईल ?

334 0

भारतीय नागरिकांचा विदेशातील प्रवास सोपा व्हावा, या दृष्टीने ई-पासपोर्टची निर्मिती करण्यात येणार आहे.ई-पासपोर्ट हे नवीन तंत्रज्ञानावर आधारित असणार आहे सोबतच सुरक्षेच्या दृष्टीने अतिशय मजबूत आणि विश्वसनिय असेल.पण ई-पासपोर्ट म्हणजे काय आहे, तो कसा वापरता येईल? तसंच आगामी दिवसांत सामान्य पासपोर्टची जागा हा पासपोर्ट कसा घेईल? या सर्व प्रश्नांची उत्तरं जाणून घेऊयात या खास माहितीतून.

काय आहे ई-पासपोर्ट ?

ई पासपोर्ट हे एक आधुनिक पासपोर्ट असेल. ज्यात चीप लागलेली असेल. जे नागरिकांच्या डेटा सेक्युरिटीसाठी उपयुक्त ठरते. या पासपोर्टमध्ये आणि बायोमॅट्रिक टेक्नॉलॉजीचा वापर देखील करण्यात येईल. चिपमुळे विदेश दौर्‍यादरम्यान पासपोर्टला सहज स्कॅन करता येवू शकते. हे पासपोर्ट अधिक सुरक्षित राहते.

कसे काम करते ई-पासपोर्ट ?

ई पासपोर्टमध्ये लागलेल्या चिपमुळे स्कॅन करणं सहज सोपं होतं. विदेश दौऱ्या दरम्यान शक्यतो लांब लाईनमध्ये उभे राहावे लागते. मात्र, ई पासपोर्ट काही सेकंदात स्कॅन होत इमिग्रेशन सोपे होते. ई पासपोर्टच्या मागे एक सिलिकॉन चीपचा वापर केला गेला आहे. ज्यात 64 kb मेमरी स्टोअर केली जाऊ शकते. या चीपमध्ये पासपोर्ट होल्डरचा फोटो आणि बायोमेट्रिक डिटेल स्टोअर असेल. ई पासपोर्ट मध्ये प्रवाशांची 30 व्हिजिट स्टोअर केले जाऊ शकतात.

‘ हे ‘ आहेत फायदे

ई-पासपोर्टमुळे बनावट पासपोर्टला आळा बसेल.
ई-पासपोर्ट फिजिकल पासपोर्टच्या तुलनेत अधिक सुरक्षित असेल.
ई-पासपोर्टमध्ये प्रवाशांचा बायोमेट्रिक डेटा स्टोअर होईल. पासपोर्ट हरवल्यास कोणत्याही प्रकारची अडचण निर्माण होणार नाही.
सर्वात खास गोष्ट म्हणजे ई-पासपोर्ट आल्यानंतर पडताळणी प्रक्रिया सुलभ होत वेळेची बचत होईल.
यासह इमिग्रेशन प्रक्रिया सुलभ होण्यास मदत होईल.

ई-पासपोर्टमधील इलेक्ट्रॉनिक चिप कशी काम करेल ?

ई-पासपोर्ट तुमच्या नियमित सामान्य पासपोर्टची डिजिटल आवृत्ती असेल. यात इलेक्ट्रॉनिक चिप असेल.जी डेटा सुरक्षिततेसाठी मदत करेल.यामध्ये लावलेल्या मायक्रोचिपमध्ये पासपोर्ट धारकाचं नाव आणि जन्म तारखेसह इतर माहिती असेल.जुन्या भौतिक पासपोर्टपेक्षा हा ई-पासपोर्ट अधिक सुरक्षित असणार आहे. यामध्ये बायोमेट्रिक डेटा संग्रहित करता येणार आहे.अशा परिस्थितीत पासपोर्ट हरवल्यास ई-पासपोर्टधारकाला फारसा त्रास होणार नाही.ई-पासपोर्ट धारकाची फसवणूक रोखण्यासही मदत होईल. हा पासपोर्ट दिल्यानंतर इमिग्रेशनसाठी लागणाऱ्या लांबच लांब रांगेतून नागरिकांची सुटका होणार आहे. त्यातील चिपच्या मदतीने पासपोर्ट इमिग्रेशन काउंटरवर सहजपणे स्कॅन केला जाईल.

कोण तयार करणार ई-पासपोर्ट ?

केंद्र सरकारने नाशिकच्या इंडिया सेक्युरिटी प्रेसला ई-पासपोर्टसाठी इलेक्ट्रॉनिक कॉन्टॅक्टलेस इनलेज आणि ऑपरेटिंग सिस्टीम खरेदी करण्याचं टेंडर दिलं आहे.नाशिकच्या इंडिया सेक्युरिटीज प्रेस जेव्हा खरेदी प्रक्रिया पूर्ण करेल, त्यानंतरच ई-पासपोर्ट जारी केले जातील.

ई पासपोर्टसाठी सन 2022-23 पासून अर्जं करण्यास सुरुवात होईल. ई-पासपोर्ट प्रक्रिया झाल्यानंतर ई-पासपोर्टधारक असणाऱ्या मोजक्या देशांच्या यादीत भारताचा समावेश होईल. सध्या ही सुविधा अमेरिका, युरोप, जर्मनीसह 120 पेक्षा जास्त देशांत सुरू आहे.

 

Share This News

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!