कोरियन मुलींसारखी स्किन हवी आहे? घरातले फक्त हे पदार्थ मिळवून देतील तुम्हाला चमकदार आणि नितळ स्किन

548 0

चमकदार, स्वच्छ डाग विरहित स्किन असावी असं प्रत्येक स्त्रीला वाटत असतं. अर्थात यामध्ये पुरुषही काही मागे नाहीत. प्रत्येकालाच वाटत असतं की आपली स्किन देखील सुंदरच दिसावी. भारतीय लोकांच्या स्किन टाईपमध्ये अनेक प्रकार आहेत. अति गोरा, गोरा, निम्न गोरा, सावळा, अतिसावळा, आणि काळा असे सगळेच रंग भारतामध्ये आपण पाहू शकतो. खरंतर रंग हा सुंदरतेचा निकष असूच शकत नाही. पण हो… रंग कोणताही असू द्या तुमची त्वचा मात्र चमकदार, डाग विरहित असेल तर तुम्ही हमखास सुंदरच दिसल.

आपण बऱ्याच वेळा कोरियन मुलींची स्किन पाहतो आणि प्रश्न पडतो की ह्यांची स्किन एवढी गुळगुळीत आणि चमकदार कशी दिसते ? बरोबर ना… चला तर मग आज मी तुम्हाला घरातीलच काही पदार्थ एकत्र करून एक नाईट क्रीम बनवायला शिकवणार आहे. ज्याचा योग्य वापर केल्याने अवघ्या सातच दिवसांमध्ये तुम्हाला तुमच्या स्कीममध्ये बदल दिसायला सुरुवात होईल.

See the source image

यासाठी तुम्हाला लागणार आहे एक बटाटा,ग्लिसरीन, एलोवेरा जेल, तांदूळ, ई विटामिन कॅप्सूल

आता सर्वात प्रथम बटाट्याचा रस काढून घ्या. यामध्ये पाण्याचा वापर करू नका. ज्यूस काढून घेतल्यानंतर यामध्ये तुम्हाला राईस वॉटर टाकायचे आहे. अर्थात तांदूळ शिजायला लावताना त्यामध्ये जास्त पाणी घाला आणि ते चांगले खळखळून शिजू द्या. हे आधीकचे पाणी फेकून देऊ नका हेच पाणी आपल्याला वापरायचे आहे.

आता या बटाट्याचे ज्यूस मध्ये हे पाणी घाला त्यानंतर यामध्ये ग्लिसरीन एक छोटा चमचा, एलोवेरा जेल एक मोठा चमचा, दोन इ विटामिन कॅप्सूल घाला आणि हे मिश्रण तोपर्यंत ढवळत रहा जोपर्यंत याला क्रीम सारखे टेक्चर येत नाही. लक्षात ठेवा हे क्रीम बनवताना अंदाजे आठ दिवसाच्या वापर नुसारच बनवा आणि फ्रीजमध्ये स्टोअर करा.

रोज रात्री झोपण्यापूर्वी चेहरा स्वच्छ धुऊन दोन ते तीन मिनिटे गोलाकार चेहऱ्यावर आणि मानेवर मसाज करा. तुम्हाला अवघ्या सातच दिवसांमध्ये चेहऱ्यावरील डाग कमी झालेली दिसून चेहऱ्यावर एक चमक दिसायला सुरुवात होईल. हा उपाय केल्यानंतर तुम्हाला कसा फरक जाणवला हे मला कमेंट करून नक्की कळवा.

Share This News
error: Content is protected !!