पारंपरिक सरबते उन्हाळ्यात देत आहेत थंडावा

162 0

भारतातील अनेक राज्यांमध्ये मार्च महिन्याच्या आसपास उन्हाच्या झळा बसू लागतात. या दिवसात बाहेर पडणे नकोसे होते तर घरातही उकाड्याने हैराण होते. अशा या तप्त वातावरणात दही, लिंबू अथवा कोणत्याही फळांपासून बनविलेले सरबत सुखदायी ठरते.

शतकानुशतके तहान भागविणारे लिंबू, वाळा हे सरबते सर्वांनाच माहीत आहेत. पण त्याच बरोबर वेगवेगळ्या प्रदेशातील प्रसिद्ध सरबते आणि त्यांची वैशिष्ट्य देखील आहेत.

स्थानिकरीत्या तयार केलेली सरबते शतकानुशतके आपल्या इंद्रियांना तृप्त करीत आहेत. यातील प्राचीन व चविष्ट सरबते आपण पाहणार आहोत.

सोलकढी

कोकम किंवा आमसुल यांच्या मुबलक उत्पादनासाठी ओळखल्या जाणाऱ्या कोकण किनारपट्टीवरील भागात होणारे हे लाल रंगाचे फळ आहे. कोकम आणि नारळाच्या दुधापासून बनवली जाणारी सोलकढी आरोग्यदायी आहे.

गोंधोराज घोल

पश्चिम बंगालमध्ये ताकाच्याच चवीसारख्या असलेल्या लिंबा पासून बनणारे गोंधोराज घोल हे पेय प्रसिद्ध आहे. दही, काळे मीठ, साखर, बर्फाचे पाणी आणि हिरव्या रंगाच्या लिंबापासून काढलेल्या रसापासून हे सरबत बनविले जाते.

Share This News
error: Content is protected !!