गृहिणींसाठी खास टिप्स : तांदूळ जुना आहे की नवीन कसा ओळखावा…?

895 0

किचन टिप्स : घरामध्ये कोणतीही वस्तू खरेदी करत असताना त्याची शुद्धतेची पडताळणी प्रत्येक दक्ष गृहिणी करताच असते . पण तांदूळ नवीन आहे कि जुना हे कसे ओळखावे हे तेवढेही कठीण नाही . काही सोपे पर्याय असे आहेत ज्यांमुळे तांदळाची क्वॉलिटी आणि नवा-जुन्याच अंदाज देखील सहज घेता येईल .

१. तांदळाचा गोडसर वास आला तर तो नवीन आहे .
२. तांदळाचा एक दाणा दाताखाली चावून पहा . जर कटकण चावला तर तो जूना आहे .
३. जर तांदळाचा दाणा चहवल्यानंतर दाताला चिकटला तर तो नविन आहे .

नवीन किंवा जुन्या तांदळाचा भात बनवताना अशी घ्या काळजी :

१. मध्यम जूने तांदूळ असतील तर एक वाटीचा भात बनवायचा असेल तर दीड वाटी पाणी ठेवावे.
२. खूपजूने असतील तर एक वाटी तांदूळ आणि दोन वाट्या पाणी
३. भात शिजवताना तेल घातले तर भात मोकळा होतो.
४. भात शिवताना लिंबाचा रस टाकला तर भात पांढरा दिसतो व चमक येते.

Share This News
error: Content is protected !!