मुलांच्या हाती मोबाईल; पालकांना चिंता; कसे सोडवाल मुलांचे मोबाईलचे व्यसन ? वाचा हि उपयुक्त माहिती

931 0

आज-काल अगदी दोन अडीच वर्षाची मुलं मोबाईल सहज खेळतात. विशेष करून मुलांना युट्युब वरील राइम्स पाहणे तर थोड्या मोठ्या मुलांना मोबाईलवर गेम्स खेळायला खूप आवडतात. वास्तविक पाहता यामध्ये पूर्णपणे मुलांची चूक म्हणता येणार नाही. कोविडच्या काळाने मुलांना घरामध्ये डांबून ठेवावे लागले. त्यामुळे देखील मुलं एकलकोंडी झाली आहेत. तसंच शहरीकरणामुळे मैदानं देखील उरली नाहीयेत.

पण सातत्याने मोबाईलवर राहिल्याने डोळ्यांचे आजार आणि मानसिक आजार देखील उद्भवत आहेत. मग अशावेळी मुलांचं मोबाईलचं व्यसन घालवण्यासाठी काय करावे ? हे आपण पाहूयात. परंतु जर मुलांमध्ये हे व्यसन तुम्हाला अधिक दिसून येत असेल तर वेळेत वैद्यकीय सल्ला देखील नक्की घ्या.

१. सर्वात महत्त्वाचं म्हणजे मुलं आपलं अनुकरण करत असतात. त्यामुळे मुलांसमोर मोबाईल घेऊन बसणं सर्वात पहिले पालकांनीच बंद करायला हवं.

२. घरापासून मैदान दूर असेल तर वेळ काढून मुलांना मैदानावर खेळायला घेऊन जा. मित्रांमध्ये जाऊ द्या, पडू द्या, लागू द्या… जास्त पझेसिव्ह राहू नका.

३. मुलांना दमदाटी करणे बंद करा. आजच्या आज व्यसन बंद होणार नाही. त्यामुळे मोबाईल हातातून हिसकावून घेऊ नका. प्रेमाने समजावून सांगून थोडा . थोडा वेळच मोबाईल हातात द्या.

Talking with kids about COVID-19 - CK Public Health

४. मुलांशी गप्पा मारा. त्यांचं म्हणणं न कंटाळता ऐकून घ्या. त्यांच्याशी खेळ खेळा.

५. मैदानी खेळ खेळायला बाहेर पाठवता येत नसेलच तर कॅरम, चेस असे अनेक इंडोर गेम्स असतात. ते घरामध्ये आणा त्यांना अशा गेम्स मध्ये गुंतवा जेणेकरून हळूहळू ते मोबाईल विसरतील.

5 Indoor Games to Keep your Kids Busy

६. आठ नऊ वर्षाची मुलं पुरेशी कळती झालेली आहेत. त्यांना प्रेमाने समजावून सांगा. मोबाईल अति पाहण्याने किंवा अति गेम खेळल्याने त्याचे कसे दुष्परिणाम होतात हे त्यांच्या वयाला समजतील अशा भाषेत, व्हिडिओ स्वरूपात आणि फोटो स्वरूपात समजावून सांगा.

Share This News
error: Content is protected !!