घरात पैसा कमावणारे एकापेक्षा अधिक हात जरी असतील तरी अनेक वेळा घरामध्ये पैसा स्थिर राहत नाही किंवा गरजेच्या वेळी पैसा कमी पडतो असे प्रसंग उद्भवतात पैसा स्थिर राहावा यासाठी वास्तुशास्त्रानुसार काही किरकोळ सवय आहेत या सवयी खरं तर किरकोळच आहेत परंतु त्यामुळे घरातील सकारात्मक ऊर्जा वाढवून लक्ष्मी स्थिर होण्यात मदत होते चला तर पाहूयात या पाच सवयी
घर सांभाळणारी व्यक्ती ही घरातली खरी कुटुंबप्रमुख असते अर्थात घराच्या बाहेर पडून दिवसभर राब राब राबणारा चार पैसे कमावून घरामध्ये आणतो पण घरासाठी झटणारी किंवा झटणारा व्यक्ती हा सर्वात महत्त्वाचा आहे तर ते कसं घरामध्ये येणारी लक्ष्मी ही स्थिर राहण्यासाठी ती वास्तु सकारात्मक ऊर्जेने भरलेली असायला हवी सामान्यतः भारतीय संस्कृतीनुसार घर सांभाळण्याचे काम ही घरची गृहलक्ष्मी करत असते म्हणजेच पत्नी आई यांचा घराच्या समृद्धीमध्ये मोलाचा वाटा असतो त्यामुळे गृहलक्ष्मी नी काही सवयी सर्वप्रथम स्वतःमध्ये आणि त्यानंतर कुटुंबीयांमध्ये सवयींचा सराव करावा
- घर रोज सकाळी स्वच्छ झाडल्यानंतर पाण्यामध्ये खडीमिट आणि सुगंधित द्रव्य टाकून फरशी अवश्य पुसा त्यामुळे जंतू नाहीसे होऊन घरामध्ये सुंदर वास राहतो ज्यामुळे मन प्रसन्न राहते स्वच्छ घर हे लक्ष्मीला नेहमीच आवडते
- घर सकाळी स्वच्छ झाडून घेतल्यानंतर घरातील व्यक्तींची संख्या जास्त असणे किंवा घरात लहान मुल असेल तर अशावेळी घर एकापेक्षा अधिक वेळा झाडावे लागते परंतु घर झाडताना अवश्य लक्षात ठेवा की सायंकाळी पाच नंतर घर झाडू नका किंवा रात्री बे रात्री देखील घर झाडू नका पाचच्या आधी पुन्हा एकदा घर झाडताना उलट्या बाजूने झाडा अर्थात सामान्यतः घर झाडताना आपण आतल्या बाजूने कचरा बाहेरच्या दिशेने झाडत जातो. यावेळी मात्र घराच्या बाहेर जाण्याच्या रस्त्याकडून उलट्या दिशेने घर झाडा आवश्यक असेल तरच घर झाडा
- जेवण झाल्यानंतर खाल्ल्या ताटातच हात धुवून नका ताटातील उरलेले खरकटे एखाद्या भांड्यामध्ये बाजूला घेऊन खरकटे घराच्या बाहेर काढून ठेवा खरकटे भांडे देखील घराच्या बाहेर ठेवा रात्री भांड घासत असाल तर उत्तमच
- रात्री झोपताना ओट्यावर कचरा करू नका रात्री अन्नपूर्णा माता घरामध्ये विशेषतः स्वयंपाक घरामध्ये येते अशी श्रद्धा आहे त्यामुळे ओटा रात्री झोपताना स्वच्छ करूनच झोपा त्यावर खरकटे भांडे किंवा खरकटे ठेवू नका त्याचा एक परिणाम असाही होतो की अन्नपदार्थ उघडे दिसले किंवा खरकट उघडं दिसलं तर जीव जंतू आणि झुरळे लवकर होतात या ताणातून देखील तुम्ही दूर व्हाल जमल्यास ताटलीमध्ये कापूर आणि लवंग जाळा
- सायंकाळी घराच्या मुख्य दरवाजा बाहेर तुळशीसमोर किंवा दाराच्या एका बाजूला दिवा लावा तिन्ही सांजेच्या वेळी हा दिवा लावून लक्ष्मीमातेला हात जोडून तिचे स्वागत करा
- घरात प्रवेश करण्याची जागा नेहमी स्वच्छ ठेवा दारातच चपला काढणे अस्ताव्यस्त चपला कशाही टाकून देणे किंवा इतर कोणत्याही प्रकारचा कचरा दारात ठेवूच नका मुख्य प्रवेशद्वारा नेहमी स्वच्छ सुगंधित आणि स्वागतासाठी तयार असू द्या
- देवपूजा भलेही रोज जमत नसेल पण सकाळ संध्याकाळ देवासमोर दिवा आणि उदबत्ती लावायला विसरू नका सकाळी तुपाचा दिवा आणि सायंकाळी तेलाचा दिवा लावल्यास उत्तम महत्त्वाच्या कामासाठी बाहेर पडणार असाल तर देवासमोर तुपाचा दिवा अवश्य लावा
- झाडू नेहमी उभा करून ठेवा ज्या बाजूने झाडूची मूठ आहे ती बाजू फरशीच्या दिशेने ठेवा
- ज्या लॉकरमध्ये तुम्ही महत्त्वाची धनसंपत्ती ठेवता त्या लॉकरवर स्वस्तिक काढायला विसरू नका दर अमावस्येला हा स्वस्तिक न विसरता काढा
- आपल्याला मिळणाऱ्या संपत्तीतला एक टक्का वाटा तरी दान करायला शिका रोज स्वयंपाक करताना पुरीच्या आकाराची पोळी लाटा आणि जी भाजी तुम्ही बनवणार असाल तिलाच नैवेद्य म्हणून देवासमोर ठेवा ज्या परमेश्वराच्या कृपेने आणि आशीर्वादाने आपण अन्न खाणार आहोत त्याला सर्वप्रथम घासातला घास वाढवून ठेवा त्यामुळे परमेश्वर भरभरून देईल
- घरामध्ये नेहमी सकारात्मक विचार करा कोणताही ताणतणाव असेल तरी सातत्याने त्यावर चर्चा करणे टाळा घर नेहमी तथास्तु म्हणत असते त्यामुळे तुम्ही जितके नकारात्मक विचार कराल त्याला वास्तू तथास्तु म्हणते आहे हे विसरू नका एखादी गोष्ट जर घडत नसेल तर हो ही गोष्ट लवकरच घरात घडेल असे म्हणत रहा आणि वास्तूने तथास्तु म्हटल्यानंतर वास्तूचे आशीर्वाद देखील मिळवा
- झोपेतून उठल्यानंतर सर्वात पहिले काम अंथरूण व्यवस्थित उचलून जागच्या जागी ठेवाच दिवसभर पडून राहिलेले अंथरून पाहून लक्ष्मी परत फिरते
- अमावस्या आणि पौर्णिमेला घरावरून पाच वेळा एक नारळ उतरवून दूर फेकून या मुळे घर आणि कुटुंबातील व्यक्तींना लागलेली बाधा दूर होईल
- सायंकाळी घरामध्ये येणारी कोणतीही महिला हिला लक्ष्मीच समजून तिचा आदर सत्कार अवश्य करा घरा शेजारची जरी महिला घरामध्ये आली तर कमीत कमी तिला हळद-कुंकू लावून हातावर साखर दिल्यानंतरच घराबाहेर पडू द्या सर्वात महत्त्वाचे म्हणजे घरात आलेली सवाष्णा आहे की विधवा यांनी काहीही फरक पडत नाही स्त्री योनीमध्ये जन्माला आलेली प्रत्येक महिला ही देवीचा अवतार आहे